Nashik Crime : केकचे पैसे मागितल्याने बेकरी मालकावर कोयत्याने वार, जिथे हल्ला केला तिथेच पोलिसांनी धिंड काढली

पुण्यातील कोयता गँगचं लोण आता नाशिक शहरात, किरकोळ कारणावरुन कोयत्याने हल्ला करण्याच्या घटना घडत असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आरोपींवर कठोर कारवाईची मागणी नाशिककरांकडून केली जात आहे.

Updated: Mar 27, 2023, 02:57 PM IST
Nashik Crime : केकचे पैसे मागितल्याने बेकरी मालकावर कोयत्याने वार, जिथे हल्ला केला तिथेच पोलिसांनी धिंड काढली title=

Nashik Crime : पुण्यानंतर कोयता गँगचं (Koyta Gang) लोण आता नाशिकमध्ये (Nashik) पसरलंय. गेल्या काही दिवसात कोयत्याने हल्ला करण्याच्या अनेक घटना नाशिक परिसरात घडल्या आहेत. आता किरकोळ कारणातून थेट कोयत्याने हल्ला करण्याची पुन्हा एक घटना समोर आली आहे. नाशिकच्या सातपूर परिसरात ही घटना घडली असून हल्ल्याची संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. नाशिकच्या सातपूर परिसरात असलेल्या अभिषेक बेकरी इथं  पाच ते सात युवक केक घेण्यासाठी आले होते. बेकरी मालक (Bakery Owner) आणि त्या तरुणांमध्ये पैशांच्या देवाणघेवाणीवरुन किरकोळ वाद झाला. या वादाचं पर्यावसन थेट हाणामारीत झालं.

बेकरी मालकावर कोयत्याने हल्ला
हा वाद इतका टोकाला गेला की टोळक्यातील एका तरुणाने थेट कोयता काढत बेकरी मालकावर हल्ला केला. तर दुसऱ्या एका तरुणाने बेकरी मालकाच्या डोक्यात दगड मारला. या हल्ल्यात बेकरी मालक जखमी झाले आहे. हल्ला केल्यानंतर तरुणांचं ते टोळकं तिथून पसार झाले. याप्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली.

पोलिसांनी काढली धिंड
हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली होती. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींची ओळख पटवली आणि ताबडतोब सहा आरोपींना अटक केली. शुभम अरुण पवार, हेमंत अरुण गाडेकर, मुकेश  दिलीप कुंभार , सागर सुरेश गायकवाड, नयन विठ्ठल गावडे, पंकज ऊर्फ विकी कैलास अशी या संशयित आरोपींची नावं आहेत. ज्या ठिकाणी हल्ला केला होता, त्याच ठिकाणी पोलिसांनी या सर्व आरोपींची धिंड काढली. 

मद्यपींचा टपरी चालकवर हल्ला
दरम्यान नाशिक शहरातील एमआयडीसी परिसरात हल्ल्याची आणखी एक घटना घडली आहे. मद्यपी तरुणांनी पैसे देण्याच्या वादातून एका टपरी चालकावर धारदार चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात टपरी चालक गंभीर जखमी झाला आहे. अंबड सिमेंट कंपनीसमोर ही घटना घडली. अंबडच्या सिमेंस कंपनी च्या समोरील बाजूस एक टपरी चालक आहे. मद्यपान केलेले तीन ते चार तरुण टपरीवर खरेदी करण्यासाठी थांबले होते. यावेळी पैसे देणे घेण्यावरून वाद झाला मद्यपान केलेल्या तरुणांनी थेट टपरी चालकावर धारदार चाकूने वार केले. यावेळी टपरी चालकाला वाचवण्यासाठी आलेल्या हार्डवेअर व्यवसायिकावरही हल्लेखोरांनी वार केले. 

हा प्रकार तिथल्या ग्रामस्थांना समजताच, ग्रामस्थांनी देखील घटनास्थळी धाव घेत हल्लेखोरांना बेदम चोप दिला. या घटनेत हल्लेखोर तसंच काही ग्रामस्थ देखील जखमी झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. याप्रकरणी अंबड पोलिसांनी ग्रामस्थ तसंच हल्लेखोरांना ताब्यात घेतलं आहे. नाशिक शहरातील एमआयडीसीमध्ये सध्या गुन्हेगारांची वर्दळ आहे. नुकतेच एका कंपनीच्या सीईओचा खून करण्यात आला होता