नक्षल चळवळीची प्रमुख महिला नर्मदाक्काला पोलीस कोठडी

नक्षल चळवळीतील सदस्य नर्मदाक्का हिला गडचिरोली न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ANI | Updated: Jun 13, 2019, 10:32 PM IST
नक्षल चळवळीची प्रमुख महिला नर्मदाक्काला पोलीस कोठडी title=
Representational image (File photo)

गडचिरोली : नक्षल चळवळीतील सर्वोच्च संघटना असलेल्या सीपीआय माओईस्ट संघटनेची एकमेव महिला सदस्य असलेल्या नर्मदाक्का हिला गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. महाराष्ट्रात नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, गडचिरोली न्यायालयाने नर्मदाक्का आणि तिच्या पतीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

गडचिरोली पोलिसांनी जहाल नक्षली नर्मदाक्का आणि पती किरण या जोडप्याला अटक केली होती. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. सिरोंचा बस स्थानकावरून नर्मदाक्का आणि तिचा पती किरण यांना अटक केली. गेल्या २५ वर्षांपासून भूमिगत असलेली जहाल नक्षलवादी नर्मदा तथा अलुरी कृष्णा कुमारी ऊर्फ सुजाथक्का (६०) आणि तिचा पती किरणकुमार (५७) या दोघांना तेलंगणा आणि गडचिरोली पोलिसांनी संयुक्तपणे हैदराबाद येथे अटक केली. हे दाम्पत्य अगदी सुरुवातीपासून नक्षल चळवळीत सक्रिय होते.  

नर्मदाक्का जहाल आणि हिंसक कारवायांसाठी २५ वर्षांपासून कुख्यात आहे. यंदा १ मे रोजी जांभूळखेडा स्फोटासाठी नर्मदाक्काने आखणी केली होती. जिल्ह्यांत तिच्याविरोधात ६५ गुन्ह्यांची नोंद आहे. पती किरण नक्षली चळवळीच्या प्रभात मासिकाचा संपादक होता.