नरेंद्र दाभोलकर हत्या तपासात सीबीआयला धक्का

सीबीआय न्यायालयाला खोटी माहिती देत असल्याचंही त्यांनी कोर्टात म्हटलं

Updated: Sep 11, 2018, 08:57 AM IST
नरेंद्र दाभोलकर हत्या तपासात सीबीआयला धक्का title=

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येच्या तपासाप्रकरणी न्यायालयानं सीबीआयला धक्का दिलाय. दाभोलकरांच्या हत्या प्रकरणातले आरोपी राजेश बंगेरा आणि अमित दिगवेकरच्या कोठडीची मागणी पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयानं फेटाळलीय. तर शरद कळसकरला पंधरा तारखेपंर्यत सीबीआय कोठडी देण्यात आलीय. दिगवेकर आणि बंगेराची पुन्हा कर्नाटक एसआयटीकडे रवानगी होणार आहे. 

दरम्यान, आरोपी राजेश बंगेरा यानं सीबीआय कोठडीत आपल्याला एसआयटीकडून मारहाण झाल्याची तक्रार न्यायालयासमोर केली. त्यानंतर राजेश बंगेरा आणि अमित दिगवेकरला न्यायालयीन कोठडी देण्यात आलीय. 

सीबीआयचे सरकारी वकील विजयकुमार ढाकणे यांची उच्च न्यायालयात रिमांड रिपोर्टवर युक्तिवाद करायचा नाही, असं सांगितल्याचा युक्तिवाद मागील पोलीस कोठडीवेळी करण्यात आला होता. पण बचाव पक्षाचे वकील धर्मराज यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयात असा उल्लेख नसल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. सीबीआय न्यायालयाला खोटी माहिती देत असल्याचंही त्यांनी कोर्टात म्हटलं. 

दरम्यान, सीबीआयला बंगेरा आणि दिगवेकर यांच्या तपासतील प्रगती दाखवता न आल्याने व काय तापस करायचा हे पटवून न देता आल्याने दोघांनी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.