साई, श्रद्धा, समृद्धी ! 14 नाही तर फक्त 8 तासांत ST बस शिर्डीला पोहचवणार; समृद्धी महामार्गवरून थेट साईंच्या दर्शनाला

समृद्धी महामहार्गामुळे प्रवाशांचा वेळ तर वाचणारच आहे. सोबतच एसटीची इंधन बचत ही मोठ्या प्रमाणावर होणार आहे. समृद्धी वरून शिर्डीला जाण्यासाठी एसटी प्रवाशांना 1300 रुपये इतके प्रवासी भाडे द्यावा लागणार आहे. पूर्वी दुसऱ्या मार्गाने नागपूर ते शिर्डी दरम्यानचे प्रवासी भाडे देखील इतकेच होते. 

Updated: Dec 12, 2022, 08:30 PM IST
साई, श्रद्धा,  समृद्धी !  14 नाही तर फक्त 8 तासांत ST बस शिर्डीला पोहचवणार; समृद्धी महामार्गवरून थेट साईंच्या दर्शनाला  title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : विदर्भातल्या(Vidarbh) साईभक्तांसाठी खुशखबर आहे. समृद्धी महामार्गवरून(Samriddhi Highway) थेट साईंच्या दर्शनाला जाता येणार आहे. विशेष म्हणजे या प्रवासासाठी   14 नाही तर फक्त 8 तास लागणार आहेत. समृद्धी महामार्गावरून नागपूर ते शिर्डी अशी(Nagpur to Shirdi ST Bus Service ) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बससेवा सुरू होणार आहे.   रात्री नऊ वाजता नागपुरातून निघणारी बस समृद्धी महामार्ग वरून पहाटे पाचच्या सुमारास शिर्डीला पोहोचणार आहे. आधी दुसऱ्या मार्गाने नागपूरपासून शिर्डीला जाण्यासाठी 14 तासांचा वेळ लागायचा. मात्र, आता अवघ्या 8 तासात शिर्डी पर्यंतचा प्रवास पूर्ण करता येणार आहे. म्हणजे नियोजन केल्यास एक दिवसात एसटीने शिर्डी दर्शन करून नागपूरला परतता येणार आहे.

समृद्धी महामहार्गामुळे प्रवाशांचा वेळ तर वाचणारच आहे. सोबतच एसटीची इंधन बचत ही मोठ्या प्रमाणावर होणार आहे. समृद्धी वरून शिर्डीला जाण्यासाठी एसटी प्रवाशांना 1300 रुपये इतके प्रवासी भाडे द्यावा लागणार आहे. पूर्वी दुसऱ्या मार्गाने नागपूर ते शिर्डी दरम्यानचे प्रवासी भाडे देखील इतकेच होते. 

सध्या ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली असून भविष्यात इतर शहरांसाठीही एसटी समृद्धी महामार्गाचा वापर करेल. समृद्धी महामार्गावरून एसटीच्या सेवा वाढवल्या जातील अशी माहिती एसटीचे विभाग नियंत्रक श्रीकांत गभने यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती या समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या बस बसमधील प्रवाशांनाही मिळणार आहेत. नागपूर शिर्डी समृद्धी महामार्गावरील प्रायोगिक तत्त्वावरील एसटी बस सेवेचा हा उपक्रम यशस्वी ठरल्यास लवकरच समृद्धीवरून पुढे आणि मुंबई करताही एसटी बस सेवा सुरू करण्याचा मानस महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.