सांगली : रत्नागिरी-नागपूर महामार्गाचे चौपदरीकरण केलं जाणार आहे. मात्र या संपादनाला मिरज तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. नेमकी त्यांची काय भूमिका आहे. तसंच प्रशासनाचीही नेकमी काय बाजू आहे.
रत्नागिरी-नागपूर या १६६ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्गाचं चौपदरीकरण केलं जाणार असून जमीन संपादनासाठी सर्व्हेचं काम सुरूय. हा महामार्ग, सांगली जिल्ह्यातील मिरज आणि कवठेमहांकाळ या दोन तालुक्यातून जमीन संपादन केली जाणार आहे. मात्र या संपादनाला मिरज तालुक्यातील शेतक-यांनी विरोध केलाय. आधी निश्चित केलेल्या जागेऐवजी चुकीच्या पद्धतीनं अन्य जागेचा सर्व्हे सुरू अशून शासकीय अधिका-यांच्या मनमानी कारभारामुळे इथल्या शेतक-यांना मोठा फटका बसणार असल्याचा आरोप होतोय.
मिरज तालुक्यातील शेतकऱ्यांची ४२ घर जमीनदोस्त होणार असून या परिसरातील विहिरी आणि शेतीच मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचा आरोप होतोय. दरम्यान महामार्गाचा सर्व्हे बदलण्यात आला असल्याचा शेतकऱ्यांचा गैरसमज झाला असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं निश्चित केलेल्या जागेतूनच काम केलं जाणारे आहे. तसेच नियमाप्रमाणंच जमीन संपादित केली जाईल आणि शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला जाणार असल्याचा खुलासा प्रशासनाकडून करण्यात आलाय.
महामार्ग हा विकास प्रक्रियेतील एक महत्वाचा घटक आहे. त्यामुळे शेतकरी आणि प्रशासनाच्या समन्वयातून मार्ग काढणे गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.