नागपूर पोलिसांकडे स्पॉट चालानसह पेमेंट मशीन

पूर्णत: कॅशलेस आणि पेपलेसच्या दिशेने नागपूर शहर वाहतूक पोलीस विभागाने आणखीन एक पाऊल पुढे टाकले आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Feb 10, 2018, 11:33 PM IST
 नागपूर पोलिसांकडे स्पॉट चालानसह पेमेंट मशीन title=

नागपूर : पूर्णत: कॅशलेस आणि पेपलेसच्या दिशेने नागपूर शहर वाहतूक पोलीस विभागाने आणखीन एक पाऊल पुढे टाकले आहे.

नागपूर शहर पोलीस विभागात आता स्पॉट चालानसह पेमेंट मशीन दाखल झाली आहे. 

ऑन द स्पॉट दंडाची रक्कम

 त्यामुळे वाहनचालकाला ऑन द स्पॉट दंडाची रक्कम भरता येणार आहे. परिणामी वाहुतुकीचे नियम तोडल्यानंतर दंड भरायला आता पोलीस ठाणं किंवा पोस्टात दंड भरायला जावे लागणार नाही.

एटीएम कार्ड स्वाईप 

केल्यानंतर दंड भरल्याची प्रिंडेट कॉपीही वाहनचालकाला लगेचच मिळणार  आहे. सध्या नागपूर शहर वाहतूक विभागाकाडे एकच पे मशीन आहे. प्रायोगिक तत्वावर त्याचा वापर सुरु आहे. 

शिवाय यामुळे नागरिक आणि वाहतूक पोलीस कर्मचा-यांत होणारा वादही कमी होईल.