नागपूर : नागपूरच्या गांधीनगर परिसरात एलएडी चौकात मेट्रोचा पीलर उभारण्यासाठी करण्यात आलेला लोखंडी सांगाडा कोसळला. पिलर उभा करण्यासाठी हा सांगाडा उभा करण्यात आला होता. या लोखंडी सांगाड्याला शटरिंगसाठी चारही बाजूने आधार देण्यात आला होता. मात्र शटरिंग करताना रस्ता अरूंद पडत होता. त्यामुळे एका मजुराने अनवधानाने एका बाजूचा आधार असलेला लोखंडी दोर सैल केला. त्यानंतर सांगाडा त्याबाजूला वाकायला सुरूवात झाली... रस्त्यावरील वाहतूक तातडीने थांबवल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. गेल्यावर्षी सीताबर्डी भागातही याचप्रकारे मेट्रोच्या पीलरचा लोखंडी सांगाडा कोसळला होता.