नागपूर: कोरोनाच्या तिस-या लाटेचा धोका असताना नागपुरात रविवारी पुन्हा एकदा कोरोना बांधित संख्या दुहेरी आकड्यता पोहचली आहे. रविवारी नागपुरात 10 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सर्व बाधित शहरातीलच आहे. त्यामुळं नागपूर महापालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे. एकीकडे ग्रामीण भागातून कोरोना हद्दपार झाल्याचे चित्र असतानाच दुसरीकडे शहरात कोरोना पुन्हा डोकेवर काढत असल्याचं दिसत आहे.
नागपुरात कोरोनाच्या दुस-या लाटेनं प्रचंड कहर टाकला होता. दुस-या लाटेत एप्रिल महिन्यात नागपुरात दिवसाला आठ हजारपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होत होती. अनेकांचा जीवही कोरोनानं घेतला. मात्र जुनपासून कोरोना रुग्णांची संख्या घटत गेली. नागपूरच्या ग्रामीण भागात तर कोरोना नियंत्रणात आला आहे.मात्र शहरात रुग्णसंध्या एकेरी आकड्यात रुग्णसंख्या वाढ आली होती.मात्र रविवारी नागपूर शहरात कोरोनाचे नव्या 10 रुग्णांची नोंद झाली. रविवारला शहरात 3531 व ग्रामीणमध्ये 871 अशा जिल्ह्यात 4402 चाचण्या करण्यात आल्यात. त्यापैकी ग्रामीणमधून सलग तिसर्याही दिवशी एकही बाधित आढळून आला नाही.तर शहरातून 10 नव्या बाधितांची भर पडली आहे. शहरात दिवसाआड रुग्णसंख्येमध्ये झालेली ही वाढ प्रशासनाच्या सोबतच नागपूरकरांची चिंता वाढविणारी बाब ठरत आहे. नागपूरात आतापर्यंतच्या कोरोनाबाधिताची संख्या 4 लाख 93 हजाप 60 वर गेली असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.94 टक्क्यांवर आहे.आजघडीला शहरात 42 व ग्रामीणमध्ये 5 असे 47 सक्रिय रुग्ण आहे.
नागपुरात जुनपासून कोरोनाचा प्रकोर कमी होत गेल्यानंतर ऑगस्ट 5 पासून कोरोना बाधितांची दैनंदिन नोंद एक आकड्यात होत होती. 5 ऑगस्टला 12 कोरोनाबाधितांची नोंद झाल्यानंतर तब्बल एक महिना नागपुरात एक आकडी संख्येतच कोरोनाबाधित संख्या वाढत होती. मात्र रविवारी 5 सप्टेंबरला शहरात दुहेरी संख्येत कोरोनाबाधितांची भर पडली. रविवारी 10 नवे कोरोनाबाधित आढळले.