नागपूर अपघातातील 'त्या' कारमध्ये संकेत, मुलामुळे बावनकुळे अडचणीत?

Nagpur Audi Car Accident : नागपूर कार अपघात प्रकरणासंदर्भातली बातमी आहे.. अपघातग्रस्त कारमध्ये चालकाच्या बाजुला संकेत बावनकुळे बसला होता अशी माहिती पोलिसांनी दिलीय. त्यावरून विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. 

राजीव कासले | Updated: Sep 10, 2024, 09:19 PM IST
नागपूर अपघातातील 'त्या' कारमध्ये संकेत, मुलामुळे बावनकुळे अडचणीत? title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूर कार अपघात प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रशेख बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा मुलगा संकेत बावनकुळे (Sanket Bawankule) हा कारमध्ये बसला होता. तो कारचालकाच्या बाजुला बसला होता अशी माहिती पोलीस उपायुक्तांनी दिलीय. कारमधील दोघांनी मद्यप्राशन केलं होतं. दरम्यान कारचालकाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला जामीन मिळाल्याचं पोलिसांनी सांगितलंय. या प्रकरणानंतर विरोधक आक्रमक झालेत. अपघातग्रस्त कार जर बावनकुळेंच्या मुलाच्या नावावर आहे तर त्याचं एफआरआयमध्ये नाव का नाही असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. (Audi Car Accident)

संकेत बावनकुळेच्या ऑडीने दोन कार आणि एक दुचाकीला धडक दिली. यात त्या वाहनांमध्ये बसलेली लोकं किरकोळ जखमी झाली. त्यांना मेयो रुग्णालयात नेण्यात आलं होतं. प्राथमिक उपचार करून तातडीने त्यांना डीस्चार्ज देण्यात आलं.

तर पोलिसांनी एवढ्या आंधळेपणाने एखाद्या आरोपीला पाठीशी घालू नये, असं म्हणत विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. लाहोरी बारचं फुटेज मिळालं तर ते कुठे दारू पीत होते हे समोर येईल लाडक्या पोराला वाचवण्याचा प्रयत्न करू नये, पूरवा नष्ट करण्यात पोलिसांना यश आलंय असे आरोप वडेट्टीवार यांनी केलेत.

दरम्यान या प्रकरणात बावनकुळेंना टार्गेट केलं जात असलाचं उपमुख्यमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. याप्रकरणी पोलीस तपास करता, Fir दाखल केलाय, तथ्यही पोलिसांनी समोर आणले आहे. बावनकुळे यांच्यावर होत असलेले राजकारण चुकीचे आहेत असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पोलिसांनी काय माहिती दिली?

नागपूर कार अपघातावेळी नेमकं काय झालं याची माहिती पोलिसांनी दिलीय. कारमध्ये तीन लोकं होती. अर्जुन हावरे, रोनित चिंतनवार आणि संकेत बावनकुळे बसले होते. संकेत बावनकुळे गाडीत होता, तो कारन चालवणाऱ्या अर्जुनच्या बाजूला बसला होता. अर्जुन आणि रोनीत या दोघांची वैद्यकीय चाचणी केली आहे. अर्जुन आणि रोनित यांनी मद्यप्राशन केलं होतं. अर्जुन वाहन चालवत होता, त्यामुळे अर्जुन हावरेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरुवातीला संकेत बावनकुळे गाडीत होता हे आम्हाला स्पष्ट नव्हते, मात्र नंतर तपासामध्ये ही बाब समोर आली की संकेत बावनकुळे गाडीत होता.

अर्जुन आणि रोनीतला ताब्यात घेऊन ये आम्ही जेव्हा चौकशी केली, तेव्हा त्यांच्या माहितीवरून संकेत त्या गाडीत होता असं माहित पडलं म्हणून काल रात्री त्याला बोलावून त्याची चौकशी केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.