नांदेड : तीन तलाक कायद्याविरोधात नांदेडमध्ये मुस्लिम महिलांनी आंदोलन केलं.
या धरणे आंदोलनात तब्बल २५ हजाराहून अधिक मुस्लिम महिला सहभागी झाल्या होत्या. लोकसभेत तीन तलाक पद्धती विरोधातला कायदा संमत झाला. सध्या राज्यसभेत प्रस्तावित असलेल्या तीन तलाक कायद्याला मुस्लिम महिलांनीच मोठ्या प्रमाणात विरोध सुरु केलाय.
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या आदेशानुसार नांदेडमध्ये मुस्लिम मुत्तेहिदा महाजतर्फे हे आंदोलन करण्यात आलं. महिलांनीच या आंदोलनाचं नेतृत्व केलं. हजारोंची संख्या असतांनाही अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं हे आंदोलन झालं.