मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग अपघात : मृतांच्या संख्येत वाढ

 शनिवारी रात्री लोणावळ्यातल्या जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर झालेल्या अपघातातील मृतांच्या संख्येत वाढ झालीय.

Updated: Feb 4, 2018, 05:46 PM IST
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग अपघात : मृतांच्या संख्येत वाढ  title=

तळेगाव : शनिवारी रात्री लोणावळ्यातल्या जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर झालेल्या अपघातातील मृतांच्या संख्येत वाढ झालीय.

उपचारादरम्यान मृत्यू 

टेम्पो आणि कारच्या धडकेत  झालेल्या अपघातात आत्तापर्यंत सहा जणांचा मृत्यू झालाय. अपघातात गंभीर जखमी झालेल्या रिमा रामचंद्र बजाला यांचा उपचारादरम्यान आज पहाटे मृत्यू झाला.

अतिदक्षता विभागात

तर अपघातातील दुसरी जखमी मोनिका आनंद लाल हिची प्रकृती अद्याप गंभीर असून तिच्या मेंदूला मार लागला असल्याने तिला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.

तळेगाव स्पर्श हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहे.

टेम्पोला जोरदार धडक 

 एक्सप्रेस वेवर भरधाव वेगात असणाऱ्या एका कारची दुसऱ्या बाजुनं येणाऱ्या आयशर टेम्पोला जोरदार धडक बसली. 

लोणावळ्याजवळ झालेल्या या अपघात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर दोन गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये ४ महिलांचा समावेश आहे. 

हा अपघात इतका भयंकर होता की टेम्पो डिव्हायडर तोडून दुसऱ्या बाजुच्या रस्त्यावर येऊन धडकला.

महत्त्वाचं म्हणजे, पाच जणांची आसन क्षमता असलेल्या कारमध्ये पाचऐवजी सात जण प्रवास करत होते. यामध्ये एक पुरुष ड्रायव्हर होता तर इतर सर्व महिला प्रवासी होत्या. या प्रवाशांची ओळख मात्र अद्याप पटलेली नाही.