मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे वरुन प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, वाहनांच्या लांबच लांब रांगा

 Mumbai - Pune Expressway traffic jam : मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहनांचा वेग मंदावला आहे. प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.  

Updated: May 14, 2022, 12:51 PM IST
मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे वरुन प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, वाहनांच्या लांबच लांब रांगा title=

रायगड : Mumbai - Pune Expressway traffic jam : मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहनांचा वेग मंदावला आहे.(Traffic Update) प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. खालापूर टोल नाक आणि बोर घाटात मोठी कोंडी पाहायला मिळत आहे. दोन्ही लेन वरती वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. विकेंड आणि सलग लागून आलेल्या सुट्या यामुळे वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. (Mumbai - Pune Expressway is a major traffic jam)

मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर खालापूर टोलनाका आणि बोरघाटात वाहतुक कोंडी झाली आहे. विकेंड तसेच अवजड वाहनं मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे छोट्या वाहन चालकांना वाहतूक कोडींचा त्रास सहन करावा लागत आहे. बोरघाटात अम्रृतांजन पुलापासून दोन्ही बाजुला 2-3किमीच्या रांगा लागल्या आहेत. अत्यंत धिम्या गतीने वाहनं पुढे सरकत आहेत. खडांळा लोणावळा दिशेनं आणि मुबंईच्या दिशेने वाहतुक धिम्या गतीने सुरु आहे.

पुणे - मुंबई एक्सप्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाल्याने अनेकांना याचा फटका बसला आहे. बोरघाटात अम्रृतांजन पुलापासून दोन्ही बाजुला  2-3 किमी च्या रागां लागल्या असतानाच खडांळा लोणावळा दिशेने आणि मुबंई दिशेने 2-3 किमी वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे. त्यामुळे मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे प्रवास करणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.