Mumbai Metro : मुंबईच्या पोटातून धावली मेट्रो; भुयारी मेट्रोची यशस्वी चाचणी; पाहा Exclusive VIDEO

Mumbai Metro 3 : मुंबईच्या कुलाबा-वांद्रे सिप्झ मेट्रो 3 च्या अॅक्वा लाईन 3 च्या मेट्रोची भुयारी चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वीरीत्या पार पडलीय. या चाचणीचा व्हिडिओ खाली पाहा.  

Updated: Dec 11, 2022, 09:16 PM IST
Mumbai Metro : मुंबईच्या पोटातून धावली मेट्रो; भुयारी मेट्रोची यशस्वी चाचणी; पाहा Exclusive VIDEO  title=

Mumbai Metro 3 :  मुंबई मेट्रो (Mumbai Metro) रेल कॉर्पोरेशन (मुं.मे.रे.कॉ.) च्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-3 या साडेतेहसीस किमीच्या भुयारी मार्गाची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. ही चाचणी यशस्वीरीत्या पार पडलीय. या चाचपणीची एक्स्क्लुझिव्ह झलक झी २४ तासने कॅमेरात कैद केली आहे. त्यामुळे नेमकी भूयारी मार्गातून मेट्रो कशी धावणार आहे, याची झलक तुम्हाला व्हिडिओतून पाहायला मिळणार आहे.  

मुंबईच्या कुलाबा-वांद्रे सिप्झ मेट्रो 3 च्या अॅक्वा लाईन 3 च्या मेट्रोची भुयारी चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वीरीत्या पार पडलीय. या चाचणीचा एक्स्क्लुझिव्ह व्हिडिओ खाली पाहा.  

मेट्रो 3 प्रकल्पाचे टप्पे ?

  • मेट्रो 3 लाइन ही 33.5 किमीची असून एकूण 27 मेट्रो स्थानक आहे, त्यातील 26 मेट्रो स्थानक ही अंडरग्राउंड आहेत.
  • डिसेंबर 2023 पर्यंत आरे ते बीकेसी स्टेशन दरम्यान साडेअकरा किलोमीटरची फेज 1 लाइन सुरू केली जाईल.
  • यासाठी मेट्रोच्या विविध मेट्रोच्या चाचण्या या लाईनवर घेतल्या जात आहेत.
  • फेज 1 मध्ये एकूण 9 गाड्या सुरवातीला चालवण्यात येणार असल्याचं नियोजन आहे
  • फेज 2 बीकेसी ते कफ परेड हा जून 2024 पर्यंत पूर्ण करून संपूर्ण मेट्रो 3 लाईन सुरू करण्याचा प्रयत्न राहील 
  •  मात्र जो प्रकल्प 2021 मध्ये पूर्ण होणार होता तो प्रकल्प अडथळ्यांची शर्यत पार करत तीन वर्ष विलंबाने सुरू होतो आहे.

मेट्रो-3 चा काय फायदा होणार?

  •  मेट्रो 3 च्या  ट्रेन्स आठ डब्यांच्या आहेत. सुरुवातीपासूनच वाढत्या प्रवाशांची गरज पूर्ण करतील.
  •  75% मोटाराजेशनमुळे गाड्यांच्या धावण्याची कार्यक्षमता उत्तम राहील
  •  रिजनरेटिव्ह ब्रेकिंगमुळे सुमारे 30% विद्युत ऊर्जेची बचत होईल. त्याशिवाय, चाकांची तसेच ब्रेक ब्लॉक्स इत्यादी उपकरणांची झीज देखील कमी होईल.
  • मेट्रो ट्रेनच्या डब्यांची रुंदी 3200 मीमी असून उभे आणि बसलेल्या स्थितीत अंदाजे 2400 प्रवासी एका गाडीतून प्रवास करू शकतील.
  • मेट्रो डब्यांमध्ये वातानुकूलन यंत्रणेअंतर्गत कार्बन डाय ऑक्साईड आणि आद्रतेसाठी स्वयंचलित नियंत्रण प्रणाली आहे. त्यामुळे सर्व हवामान परिस्थितीमध्ये प्रवाशांना उत्तम आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल

दरम्यान या मेट्रोमुळे मुंबई आणखीण गतिमान होणार आहे. तसेच मुंबईकरांना याचा मोठा फायदा होणार आहे.