Mumbai Local Train Update: प्रवाशांचा पनवेल ते कर्जत (Panvel Karjat) प्रवास आता सोप्पा होणार आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MUTP-3)अंतर्गंत पनवेल ते कर्जतदरम्यान 29.6 किमीपर्यंतच्या एक कॉरिडोरची उभारणी केली जात आहे. मुंबईनजीकच्या प्रवाशांना या रेल्वेच्या या नवीन मार्गामुळं मोठा दिलासा मिळणार आहे. या मार्गावर बोगदा उभारण्यात येणार आहे. वावर्ले असं या बोगद्याचे नाव असून मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा असणार आहे. Mumbai Local Train Update
पनवेल आणि कर्जतमध्ये तयार होत असणाऱ्या या नव्या रेल्वे मार्गाचा प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. या रेल्वे मार्गामुळं सीएसएमटी आणि कर्जतहे अंतर कमी होणार आहे. तसंच, पनवेलहून कर्जतला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक पर्याय उपलब्ध होत आहेत. या रेल्वे मार्गावर पाच स्टेशन उभारण्यात येणार आहेत. पनवेल-कर्जत या मार्गावर उभारण्यात येणाऱ्या बोगदा हा महामुंबईतील सर्वाधीक लांबीचा बोगदा ठरणार आहे. तसंच, हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाणे आणि कल्याण स्थानकातील गर्दी मोठ्या प्रमाणात विभागली जाणार आहे. त्यामुळं गर्दीत घट होण्याची शक्यता आहे.
नवीन रेल्वे मार्गावर पाच स्थानके असणार आहे. पनवेल, चिकले, महापे, चौक आणि कर्जत अशी नवीन पाच स्थानके निर्माण करण्यात येणार आहे. रेल्वे मार्गाची एकूण लांबी 30 किमी असून उड्डाणपूल २ उभारण्यात येणार आहे. तर, 44 पूल त्यात ८ मोठे पूल आणि 36 लहान पूल बांधण्यात येणार आहे.एमयूटीपी-३ अंतर्गंत एकूण 10,947 कोटींचा खर्च येणार आहे. या प्रकल्पाला 2016 साली मंजुरी मिळाली होती. तर, मार्ट 2025पर्यंत हा मार्ग पूर्ण होण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारी 2023मध्ये वावर्ले बोगद्याचे काम सुरू झाले होते आणि 7 महिन्यांत एक ड्रिलिंगचे काम पूर्ण झाले आहे. या संपूर्ण रेल्वे मार्ग 3,144 मीटर लांब असून यात तीन बोगद्यांचे काम हाती घेण्यात आले आहे. यातील 219 मीटर लांब असलेल्या बोगद्याचे वॉटर प्रुफिंग आणि क्रॉक्रिटीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या नव्या रेल्वे मार्गासाठी 56.87 हेक्टर खासगी जमीनीवर काम सुरू आहे. 4.4 हॅक्टरी सरकारी जमीन आणि 9.13 हॅक्टर वन विभागाची जमीन देण्यात आली आहे. तर, या रेल्वे मार्गासाठी बरवई, वावरले, बेलवाली, भिंगर, लोधिवाली, किरवाली आणि वंजाळे गावाची जमीन अधिग्रहण करण्यात आली आहे.