Mumbai Old Video: महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानीचा मान मुंबईला (Mumbai) मिळाला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत येतात. सर्वांना सामावून घेणारी ही मुंबई मोठ्या आशेने येणार्या प्रत्येकाची स्वप्न पूर्ण करते. मुंबई शहर आता काळानुसार वाढतंय अनेक बदल होत गेलेत. मात्र, तरीही आपल्या आजी-आजोबांना आजही जुनी मुंबईचे किस्से रंगवून रंगवून सांगत असतात. आजही चर्चगेट, कुलाबा गिरगाव, परळ, लालबाग, चर्नी रोड या परिसरात जुन्या मुंबईच्या खुणा आढळतात. 1960 च्या काळात मुंबई कशी दिसत होती? हे तुम्हाला पाहायचंय का? (Mumbai Old Video Trending)
1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली. पण महाराष्ट्राची स्थापना झाली त्यावेळी मुंबई कशी दिसत होती. थोडीही उसंत न घेता सतत धावणारी मुंबई 73 वर्षांपूर्वी कशी दिसत होती. याची एक झलक सध्या नेटकऱ्यांना पाहायला मिळत आहे. जुन्या मुंबईचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. British Pathe या ब्रिटिश संस्थेच्या अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत जुन्या मुंबईचे विलोभनीय रुप पाहायला मिळत आहे.
व्हिडिओत 1960 सालच्या मुंबईचे दर्शन होत आहे. व्हिडिओत चर्चगेट, कुलाबा परिसराचे दर्शन होत आहे. तर, आजही प्रसिद्ध असलेले हॉटेल्स, दुकाने त्याकाळी कसे होते. हे सगळे व्हिडिओत पाहायला मिळत आहे. तसंच, डबल डेकर बेस्ट बस, सिग्नल ओलांडतानाचे नागरिक, ट्राफिक पोलिस, जुन्या गाड्या, टॅक्सी, मालवाहतूक करणारे नागरिक त्यावेळच्या इमारती हे सारं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. 1960 काळचा हा व्हिडिओ आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
मुंबईतील या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. जुनं ते सोनं, असं काहींनी म्हटलं आहे. तर, मुंबईतील हा भाग खूपच सुंदर आहे, असंही एकाने म्हटलं आहे. हे पाहून खूपच छान वाटलं. कोणालाही कुठे पोहोचायची घाई नाहीये. आभाळ ही निरभ्र आहे. आत्तापेक्षा मुंबई तेव्हा खूपच स्वच्छ होती, अशी कमेंट एका युजर्सने केली आहे.
#OldMumbai in 1960s. Rare footage.
Do watchSource-British Pathe pic.twitter.com/3oMo3kpn7a
— Mumbai Heritage (@mumbaiheritage) August 19, 2023
दरम्यान, 1960 सालीच संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या मागणीसाठी अनेक क्रांतीकाऱ्यांनी लढा दिला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अनेकांना हौतात्म प्राप्त झाले.