मुंबई-गोवा महामार्गावर नाकाबंदी दरम्यान गोमांस पकडले

 हे सर्वजण मुंबई परिसरातील आहेत. याप्रकरमी माणगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.

Updated: Aug 20, 2017, 03:18 PM IST
मुंबई-गोवा महामार्गावर नाकाबंदी दरम्यान गोमांस पकडले title=

रायगड : जिल्ह्यात माणगाव पोलिसांनी रात्री उशीरा केलेल्या कारवाईत सुमारे ४ हजार किलो वजनाचे गोवंश मांस पकडलं आहे. मुंबई गोवा महामार्गावर नाकाबंदी सुरू असताना पहाटे ४  वाजण्याच्या सुमारास जुन्या स्टॅन्डजवळ १  पीक अप टेम्पो संशयास्पदरीत्या येताना दिसला.

पोलिसांनी टेम्पो थांबवून तपासणी केली असता त्यात गोवंश मास सापडले पोलिसांनी प्रकरणी १  पिकअप,  १  स्कॉर्पियो आणि १  स्विफ्ट कारसह १० जणांना ताब्यात घेतलंय आहे , हे सर्वजण मुंबई परिसरातील आहेत. याप्रकरमी माणगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.