मुंबई : कोकणची सुकन्या डॉ. मधु निमकर यांनी 'मिसेस रायगड टॅलेंटेड' किताबावर नाव कोरले आहे. राज्यातून जवळपास १०० महिला या स्पर्धेसाठी सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत प्रमुख आकर्षण ठरल्या डॉ. मधु निमकर. त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांना रायगडमधील अत्यंत मानाचा मिसेस रायगड टॅलेंटेड किताब देऊन गौरव करण्यात आले.
सध्या त्या एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून समाज उपयोगी विधायक कामं करत आहेत. तसेच त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. त्यांना पत्रकारितेची आवडही आहे. त्यांनी काही कॉलमही लिहिले आहेत. 'स्वातंत्र्याच्या काळात' असा कॉलम लिहीला. या कॉलमचे आता पुस्तकात रुपांतर झाले आहे. 'स्वातंत्र देवतेच्या गावात' हे पुरस्तक प्रकाशित झाले आहे. १३ देशांत ते वितरीत करण्यात आले आहे. तसेच काही मराठी सिनेमांसाठी सहाय्यक लेखिका म्हणूनही त्यांनी काम केले आहे. तळागातील महिलांचे सक्षमीकरण आणि उत्कृष्ठ नेतृत्व गुणांसाठी त्यांना गौरविण्यात आले आहे. त्यांना 'आदर्श मुंबई' आणि 'लोकसेवा पुरस्कार' देऊनही गौरविण्यात आले आहे.
डॉ. मधु निमकर या मुळच्या रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरच्या. मात्र, त्यांचे शिक्षण हे मुंबईत झाले. त्यानंतर त्या अमेरिकेत काही काळ राहिल्या. त्यानंतर त्या पुन्हा मायदेशी परतल्या आणि मुंबईत राहू लागल्या. मात्र, असे असले तरी त्या सांगतात, कर्मभूमी रायगड आहे.
काही गोष्टी मिसिंग आहेत. त्यामुळे काहीतरी केले पाहिजे. म्हणून मी या स्पर्धेत सहभाग घेतला. राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यापेक्षा जिल्हास्तरावर सहभागी होणे गरजेचे आहे. कारण ज्या जिल्ह्याने माझ्यावर प्रेम केले, तेथून मी सुरुवात केली आहे. महिलांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मी माझ्या शिक्षणाचा वापर करणार आहे. त्यासाठी अमेरिकेहून पुन्हा कोकणात परतलो आहोत. मला महिलांच्या समस्यांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचा नक्कीच महिलांसाठी उपयोग होईल, असे डॉ. मधु निमकर म्हणाल्यात. याआधी डॉ. मधु निमकर यांना अभिनेते अरुण नलावडे यांच्या हस्तेही गौरविण्यात आले आहे.