MPSC : राज्य सेवा पूर्व परीक्षेचा अर्ज भरण्याची मुदत वाढवली, कधी भरायचा शेवटचा अर्ज पाहा

राज्य सेवा पूर्व परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी

Updated: Oct 30, 2021, 10:28 PM IST
MPSC : राज्य सेवा पूर्व परीक्षेचा अर्ज भरण्याची मुदत वाढवली, कधी भरायचा शेवटचा अर्ज पाहा title=

मुंबई: राज्यातील विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारी महत्त्वाची बातमी आहे. जर तुमच्या कुटुंबातील किंवा मित्र-परिवारातील कोणीही राज्य सेवा पूर्ण परीक्षेसाठी अर्ज करणार असेल तर त्यांच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 करिता अर्ज सादर करण्याचा अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे. ही तारीख दोन दिवसांनी वाढवण्यात आली असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 

राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर होती. ही तारीख वाढवण्यात आली असून 2 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत दिली आहे. राज्य सरकार वतीन याची माहिती देण्यात आली आहे. 

राज्य सेवा परीक्षा 2021 अंतर्गत 290 पदांसाठी भरती करण्यात येणार होती. मात्र या पदसंख्येमध्ये वाढ करण्यात आली. त्यामुळे अर्ज भरण्याची मुदतही वाढवण्यात आली आहे. एकूण 100 पदं वाढल्यामुळं आता 390 पदांसाठी 2 जानेवारी 2022 ला एमपीएससीकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली जाणार आहे.

या पदांचे अर्ज वेबसाईटवर जाऊन भरावे लागणार आहेत. त्यामुळे परीक्षा देण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी mpsc.gov.in या वेबसाईटवर अर्ज करायचा आहे.