MPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती, 'येथे' पाठवा अर्ज

MPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांची भरती केली जाणार आहे. याचा तपशील जाणून घेऊया. 

Pravin Dabholkar | Updated: May 13, 2024, 07:14 PM IST
MPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती, 'येथे' पाठवा अर्ज  title=
MPSC Job

MPSC Job: आजकालचे तरुण आपल्या करिअरचा गांभीर्याने विचार करताना दिसतात. त्यामुळे पदवीचे शिक्षण घेत असतानाच अनेक तरुण सरकारी नोकरीची तयारी करत असतात. सरकारी नोकरी आणि चांगला पगार हे अनेकांचे स्वप्न असते. त्यामुळे एमपीएससीच्या तयारीसाठी तरुण आपल्या करिअरची काही वर्षे देतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वेळोवेळी विविध पदांची भरती केली जात असते.  सध्या नव्या भरतीचे नोटिफिकेशन निघाले आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही महत्वाची अपडेट आहे. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

एमपीएससीकडून विविध पदांच्या एकूण 524 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीसाठी संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा परीक्षा, महाराष्ट्र वनसेवा परीक्षा, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. 

24 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. दिलेल्या मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्या. 

पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

डीआरडीओमध्ये भरती 

ज्युनिअर रिसर्च फेलो पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून बीई/बीटेक/एमई/एमटेक/एमएससी मध्ये पदवी पूर्ण केलेली असावी. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 37 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. रिसर्च असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पीएचडी पदवी पूर्ण केलेली असावी. किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग किंवा एमई/एमटेक पदवी आणि संबंधित कामाचा किमान 3 वर्षांचा अनुभव असावा. रिसर्च असोसिएट पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 67 हजार रुपये इतका पगार दिला जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज द ज्युनिअर रिसर्च फेलोशिप अरमामेंट रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट आर्मामेंट पोस्ट. पुणे- 411021 येथे पाठवावा लागेल. DRDO ची अधिकृ वेबसाइट drdo.gov.in वर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. ज्युनिअर रिसर्च फेलो आणि रिसर्च असिस्टंट पदासाठी अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. DRDO ची अधिकृत वेबसाइट https://drdo.gov.in/ वर जा.करिअर" टॅबवर क्लिक करा. आता ज्युनिअर रिसर्च फेलो किंवा रिसर्च असिस्टंट यापैकी तुम्हाला ज्या पोस्टसाठी अर्ज करायचा आहे ते निवडा. यापुढे तुम्हाला ऑनलाइन अर्ज करा या लिंकवर क्लिक करा. हे करताना तुम्हाला सर्वात आधी स्वत:ची नोंदणी करावी लागेल. यासाठी येथे न्यू युजर म्हणून पर्याय दिसेल.