Cyrus Mistry: '...अजूनही विश्वास बसत नाही', सुप्रिया सुळे सायरस मिस्त्रींच्या आठवणीत भावूक

सायरस मिस्त्रींच्या आठवणीत सुप्रिया सुळे भावूक, सोशल मीडियावर शेअर केली भावनिक पोस्ट

Updated: Sep 6, 2022, 11:43 PM IST
Cyrus Mistry: '...अजूनही विश्वास बसत नाही', सुप्रिया सुळे सायरस मिस्त्रींच्या आठवणीत भावूक title=

मुंबई : टाटा सन्सचे (tata sons) माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचे रविवारी रस्ते अपघातात निधन झाले आहे. पारशी धर्मगुरूला भेटण्यासाठी ते गुजरातमधील उडवाडा येथे गेले होते. यावेळी अहमदाबादहून मुंबईला परतत असताना त्यांची कार पालघरजवळ ( Cyrus Mistry car crash) डिव्हायडरला धडकली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर राजकीय, सामजिक आणि उद्योग विश्वातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली होती. यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule)  यांनी सायरस मिस्त्री यांच्यासाठी एक भावनिक पोस्ट लिहली आहे.

पोस्टमध्ये काय?
सुप्रिया सुळे  (Supriya sule) यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सुळे यांनी सायरस मिस्त्री सोबतचे हृदयस्पर्शी फोटो शेअर केले आहेत. मिस्त्रीसोबतच्या  (Cyrus Mistry)जवळपास 30 वर्ष जुन्या मैत्रीची आठवण सांगत त्यांनी ही पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये सुप्रिया सुळे (Supriya sule)  म्हणाल्या आहेत की, अजूनही विश्वास बसत नाही. आम्ही सर्व तुमची नेहमीच आठवण ठेवू. रेस्ट इन पीस साइरस.

सुप्रिया सुळे (Supriya sule)  यांनी याआधी देखील एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की, आमच्यातून तू निघून गेला असलास तरी आमच्या हदयातून जाणार नाही आहेस. रेस्ट इन पीस साइरस,असेही त्यांनी म्हटले होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Supriya Sule (@supriyasule)

सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी सायरस (Cyrus Mistry)आणि त्यांच्या सवयी सारख्याच असल्याचं म्हटलं होतं. असं वाटायचं की ते महाराष्ट्रीयन आहेत. कारण, त्याला ठेचा आवडतो, जो महाराष्ट्रातील शाकाहारी पदार्थ आहे आणि हिरवी किंवा लाल मिरची, मीठ, लसूण, तूप/तेल आणि लवंगा एकत्र करून बनवलेला आहे,असे त्या म्हणतात. 

दरम्यान आज दुपारी मुंबईच्या वरळी स्मशानभूमीत सायरस मिस्त्री (Cyrus Mistry)यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणाचे सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले होते. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.