Gram Panchayat Election Result 2022 : राज्यभर ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल लागला असून उमेदवार मोठा जल्लोष करत आहेत. राज्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये मतदारांनी प्रस्थापितांना धक्का देत तरूणाईच्या हाती ग्रामपंचायतीचा कारभार सोपवला आहे. (Maharashtra Grampanchayat Election Result 2022) एकमतामुळे काहींना पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. अशातच दोन ग्रामपंचायतींच्या निकालामध्ये उमेदवारांपेक्षा 'नोटा'ला (None Of The Above) सर्वाधिक मतदान झालं आहे.
पुण्यातील (Pune Grampanchayat Election Result Bhor) भोर तालुक्यामधील म्हाकोशी (Mhakoshi) गावामध्ये नोटाला सर्वात जास्ता लोकांना मतदान केलं आहे. विजयी उमेदवारापेक्षा अधिक मतदान नोटाला झालंय. विजयी उमेदवार रेखा साळेकर (Rekha Salekar) यांना 43 मतं पडली आहेत तर नोटाला तब्बल 104 मते पडली आहेत. रेखा साळेकर यांना 4 वार्ड क्रमांक1 मधून त्यांना विजयी घोषित करण्यात आलंय.
कोल्हापूरमधील चंदगड तालुक्यातील कांगणी ग्रामपंचायतीत (Kangani GramPanchayat) मतदारांनी नोटाला सर्वाधिक मतं दिली आहेत. वार्ड क्रमांक 2 मध्ये कोरे शितल अशोक यांना 279 मतदान झालं आहे. तर अमृता पाटील (Amrita Patil) यांना 46 आणि नोटाला सर्वाधिक 285 मते पडली आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन नंबरचा उमेदवार विजयी असल्याचे स्पष्ट केल्यानंतर ग्रामस्थ संतप्त झाले होते.
दरम्यान, काही ठिकाणी उमेदवार अवघ्या 1 मतामुळे विजयी झाले आहेत. तर समान मतदान झाल्यामुळे चिठ्ठी उडवून सरपंचपदाची माळ संबंधित उमेदरावाराच्या गळ्यात टाकण्यात आली आहे. भोर तालुक्यातील कासुर्डी गु. मा. या गावामध्ये अजय तात्याबा मालुसरे (Ajay Tatyaba Malusare) यांनी 1 मताने निसटता विजय मिळवला आहे.