पावसाळी अधिवेशन: शेतकरी कर्जमाफी, सिडको भूखंड खरेदी विक्री प्रकरण गाजणार

विरोधक आक्रमक होणार...

Updated: Jul 5, 2018, 09:41 AM IST
पावसाळी अधिवेशन: शेतकरी कर्जमाफी, सिडको भूखंड खरेदी विक्री प्रकरण गाजणार title=

नागपूर : नागपूर पावसाळी विधीमंडळ अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होणार आहे. विधीमंडळच्या दोन्ही सभागृहात भरगच्च कामकाज असून दुसऱ्या दिवशी विरोधक आक्रमक होणार असल्याचं चित्र आहे. शेतकरी कर्जमाफी आणि सिडको भूखंड खरेदी विक्री प्रकरण हे विषय दोन्ही सभागृहात जोरदार गाजणार आहेत.

विधानपरिषदमध्ये कामकाजात नाणार प्रकल्पावर लक्षवेधी प्रश्न मांडण्यात आला आहे. तेव्हा यानिमित्ताने पुन्हा एकदा सरकार काय उत्तर देते भूमिका मांडते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.  राज्यातील तूर खरेदी प्रश्नावर चर्चा , शेतकरी कर्जमाफी अशा विविध शेतकरी प्रश्नावर चर्चा विरोधी पक्षाने ठेवली आहे.