विदर्भातील लोकांना लवकरच उकाळ्यापासून दिलासा

गेल्या ३ महिन्यांपासून रणरणत्या उन्हाने हैराण झालेल्या नागपूरकरांना आता पुढच्या काही दिवसांतच दिलासा मिळणार आहे. 

Updated: May 31, 2017, 08:27 AM IST
 विदर्भातील लोकांना लवकरच उकाळ्यापासून दिलासा title=

नागपूर : गेल्या ३ महिन्यांपासून रणरणत्या उन्हाने हैराण झालेल्या नागपूरकरांना आता पुढच्या काही दिवसांतच दिलासा मिळणार आहे. 

केरळ आणि पूर्वोत्तर राज्याच्या वेशीपर्यंत पोचलेला मान्सून ७ जूनच्या सुमारास विदर्भात दाखल होणार आहे. ७ ते १० जूनच्या दरम्यान मांसूनची विदर्भात कधीही एंट्री होऊ शकते. 

केरळ आणि पूर्वोत्तर भागातील आसाम, मिझोराम, मणिपूर पर्यंत पोचलेल्या मांसूनच्या सरी शेजारच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यात १५ तारखेपर्यंत दाखल होतील. 

शिवाय मान्सूनच्या आगमनाची चाहूल देणारा मान्सून-पूर्व पाऊस देखील अनुभवायला मिळणार असल्याचे वेध शाळेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मान्सून यंदा लवकर येणार असल्यानं विदर्भातील शेतकरीही खूष झालाय.