जळगाव : राज्यात बॉम्बस्फोट घडवून मोठा घातपात करण्यात येणार असल्याचा उल्लेख असलेले आयसीस या दहशतवादी संघटनेचं धमकीचंपत्र जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झालंय.
या पत्रामुळे जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडालीय. टपाल विभागात संबंधीत कर्मचाऱ्यांना हे धमकी पत्र आढळले. आयसीसच्या पत्रामुळे गोपनीय यंत्रणेसह सर्वत्र खळबळ उडालीय.
या धमकीपत्रानुसार सतर्कता म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांना पत्र पाठविण्यात आलंय. जिल्हाधिकारी बुलडाणा, भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक, जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव यांच्यासह यंत्रणेला या पत्रामुळे अलर्ट करण्यात आलेय.