विरारमध्ये ऑर्केस्ट्रात पैशांचा पाऊस, नोटा उचलण्यासाठी एकच गर्दी, VIDEO व्हायरल

विरारमध्ये ऑर्केस्ट्रात लाखो रुपयांचा पाऊस, पाहा कोणत्या गायिकेवर उधळले लाखो रुपये

Updated: Feb 20, 2022, 02:20 PM IST
विरारमध्ये ऑर्केस्ट्रात पैशांचा पाऊस, नोटा उचलण्यासाठी एकच गर्दी, VIDEO व्हायरल title=

विरार : विरारमध्ये (Virar) गुजराती समाजाच्या एका धार्मिक कार्यक्रमात लाखो रुपयांच्या पैशाचा पाऊस पडला आहे. प्रसिद्ध गुजराती गायिकेच्या गाण्यावर ताल धरत तिच्या अंगावर शेकडो जणांनी नोटांचे बंडलच्या बंडल उधळले आहेत.

पैशांचे नोटांचे बंडल उधळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून या प्रकारावरून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. स्वयं चैतन्य शक्तीधाम गोशाळाच्या माध्यमातून विरारच्या रायपाडा इथं शनिवारी रात्री या कार्यक्रमाचं आयोजित केलं होतं.

राजस्थान मधील प्रसिद्ध गायिका कच्छ कोकिळा गीताबेन रबारी, संतवणी आराधक गोविंदभाऊ गाढवी, लोक साहित्यिकार प्रतापदान गाढवी यांच्या गाण्याचा हा धार्मिक कार्यक्रम होता. 

शनिवारी मध्यरात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम सुरू होता गाणे चालू असताना एकामागून एक जण येऊन पैशाची उधळण करत असतानाचे व्हिडीओ मध्ये दिसत आहे. विरार सह मीरा भाईंदर ठाणे आणि आजूबाजूच्या गावातील गुजराती समाजातील हौशी मंडळींनी या कार्यक्रमात हजेरी लावली होती.