'मोदी सरकारने सगळ्यांना एप्रिल फुल केलेय'

केंद्रातल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशवासीयांची घोर फसवणूक करून सगळ्यांना एप्रिल फुल केलल्याचा आरोप काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केलाय.  

Surendra Gangan Updated: Apr 3, 2018, 09:49 AM IST
'मोदी सरकारने सगळ्यांना एप्रिल फुल केलेय' title=

सोलापूर : केंद्रातल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशवासीयांची घोर फसवणूक करून सगळ्यांना एप्रिल फुल केलल्याचा आरोप काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केलाय. सोलापुरात काँग्रेसच्या सरकार  विरोधी बोंबाबोंब आंदोलनात त्यांनी मोदींच्या धोरणांवर घणाघाती टीका केली.

जनतेसाठी आता आपली चूक कळून आली, असे सांगताना महागाई, काळा पैसा परत आणण्याचं आश्वासन यासह अनेक मुद्द्यांवर सरकारनं जनतेची फसवणूक केल्याचा आरोप शिंदे यांनी केलाय. 

निवडणुकीत भाजप नेत्यांनी जनतेला अनेक आश्वासने दिली होती. प्रचारसभेत आश्वासनांचा पाऊस पडायचा. आता सत्तेत आल्यावर त्यांना आपल्याच आश्वासनांचा विसर पडला आहे. मूळ प्रश्न बाजूला ठेवून नवीन विषय चर्चेला आणले जात आहेत, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली.