मुंबईत मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांत झटापट, सोलापुरात राडा; महिला पोलीस कर्मचारी जखमी

MNS activists clash with police in Mumbai​ : भोंग्यांबाबतच्या अल्टिमेटमनंतर मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पोलिसांनी धरपकड सुरु केली आहे. यावेळी मनसैनिकांसोबत झालेल्या झटापटीत महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली.

Updated: May 4, 2022, 12:51 PM IST
मुंबईत मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांत झटापट, सोलापुरात राडा; महिला पोलीस कर्मचारी जखमी title=

मुंबई : MNS activists clash with police in Mumbai : भोंग्यांबाबतच्या अल्टिमेटमनंतर मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पोलिसांनी धरपकड सुरु केली आहे. त्यामुळे मनेस आंदोलनाला पोलिसांकडून चाप लावला जात आहे. दुपारी 1 च्या अजानपूर्वीच मुंबईसह परिसरातील मनसे नेत्यांची धरपकड करण्यात आली आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे पोलिसांच्या तावडीतून निसटले आहेत. यावेळी मनसैनिकांसोबत झालेल्या झटापटीत महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली.

राज्यभरात मनसे कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. मुंबईत मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांना पोलीस ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असताना मोठा गोंधळ उडाला. संदीप देशपांडे हे घटनास्थळावरून निघून जात असताना त्यांना पकडण्याच्या प्रयत्नात एक महिला पोलीस कर्मचारी रस्त्यावर खाली पडल्यात.

पुण्यात मशिदीबाहेर हनुमान चालिसा लावण्यावरुन मनसे कार्यकर्ते आक्रमक दिसून आलेत. वारजे आणि खालकर भागात पोलिसांकडून मनसैनिकांची धरपकड केली. तर सोलापुरात मनसे कार्यकर्ते-पोलिसांत राडा पाहायला मिळाला. मनसेकडून मशिदीसमोर हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न हाणून पाडला. सोन्या मारुती मंदिरात हा प्रकार घडला.

अंबरनाथमध्ये मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्पीकरसह ताब्यात घेतलं आहे. रिक्षेने मशिदीसमोर हनुमान चालीसा लावायला जाताना पोलिसांनी पकडलं. मनसे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के, शहर उपाध्यक्ष प्रशांत नलावडे, उपजिल्हा सचिव नितीन पाटील यांना पोलिसांनी स्पीकरसह घेतलं ताब्यात घेतलं आहे. 

तसेच अंबरनाथमध्ये मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हे मनसे कार्यकर्ते बाईकवरून ''ट्रिपल सीट'' जात असताना, पोलिसांनी त्यांना रोखून ताब्यात घेतलं. वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मनसेचे शहर सचिव अविनाश सुरसे यांना ताब्यात घेतले आहे.

 धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये धार्मिक स्थळांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडूनच सकाळपासूनच काळजी घेतली जात आहे. धुळ्यात मनसेच्या आठ पदाधिका-यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. 

 भंडाऱ्यात मस्जिदमध्ये भोंग्यांशिवाय पहाटेची अजान झालीयं.. जिल्ह्यात हिंदू-मुस्लिम सर्व समाजाच्या बांधवांनी समजदारी घेतली असून रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत कोणतेही ध्वनि प्रदूषण करण्यास टाळलं आहे..जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी ध्वनी प्रदुषण टाळण्याचे आदेश दिले होते..त्यामुळे जिल्ह्यात सध्या शांतता आहे 

मनसेनं दिलेल्या इशा-यांतर भिवंडी शहरात तणावपूर्ण शांतता आहे.. भोंगा आंदोलनापूर्वीच पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.. दरम्यान कोणताही वाद निर्माण होऊनये म्हणून शहरात पहाटीची अजानही भोंग्यावीनाच करण्यात आली.  

धुळ्यात मशिदीसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा लावण्यासाठी निघालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. भोंगा घेऊन हनुमान चालीसा लावण्यासाठी निघाल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. मात्र वेळीच पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून भोंगा जप्त करून मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.मनसे जिल्हाध्यक्ष दुष्यंत राजे देशमुखांसह अन्य कार्यकर्त्याना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

गोंदिया जिल्ह्यात मनसे कार्यकर्त्यांकडून नमाजावेळी महाआरती करण्यात आली नाही..नमाजावेळी कुठेही हनुमान चालिसा न लावता  हिंदु-मुस्लिम ऐक्य दिसून आलं... त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यत राज ठाकरे यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.

जळगावात मनसेनं शनीपेठ भागात शनी मंदिरावर भोंगे लावलेयत. भोंग्याचा आवाज तपासणी करत असताना पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. जिल्हापेठ पोलीस स्टेशनला आणून मनसे कार्यकर्त्यांना समज देत कार्यकर्त्यांची केली सुटका केलीय.