मुंबईतल्या मनसे काँग्रेस वादाचं लोण आता पुणे, नाशिकमध्ये

पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी आज सिंहगड रोड तसंच फर्ग्युसन रोड परिसरातील फेरीवाल्यांचे स्टॅाल्स फोडले. 

Updated: Nov 2, 2017, 11:37 PM IST
मुंबईतल्या मनसे काँग्रेस वादाचं लोण आता पुणे, नाशिकमध्ये title=

पुणे : पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी आज सिंहगड रोड तसंच फर्ग्युसन रोड परिसरातील फेरीवाल्यांचे स्टॅाल्स फोडले. 

दुपारच्या सुमारास ३० ते ४० कार्यकर्त्यांनी फळ विक्रेत्यांचे स्टॉल्स तसेच टेम्पोची तोडफोड केली. त्याचप्रमाणे त्यांच्याकडील माल फेकून रस्त्यावर फेकून दिला. त्यात विक्रेत्यांचं मोठं नुकसान झालं.

एफफिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणानंतर फेरीवाल्यांविरोधात मनसे चांगलीच आक्रमक झालीये. मुंबईत ठिकठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी फेरीवील्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. कल्याण डोंबिवलीमध्ये जिल्हाधिका-यांच्या जमिनीवर विकास करताना अडचणी निर्माण होत असल्याच्या निमित्तानं ही भेट होती. 

त्यामुळे वर्षानुवर्षं तिथे राहणा-या स्थानिकांचं पुनवर्सन करण्यात अडचण येत असल्याचा मुद्दा राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांपुढे मांडला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिका-यांशी तात्काळ दूरध्वनीवरुन चर्चा केली. 

दरम्यान, मनसेनं पंधरवड्यापासून पुकारलेलं फेरीवाला आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, या बैठकीत चर्चा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र फेरीवाल्यांसादर्भात यावेळी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.