नवी मुंबई : ऐरोली टोलनाक्यावर मनसेनं आंदोलन करुन फ्री केलाय.
मनसेनं ठाण्यातील विटावा ब्रिजखाली पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्ता बनवण्याचे काम सुरू असल्यानं सर्व वाहतूक ऐरोली मार्गे वळवलीय.
त्यातच सलगच्या आलेल्या सुट्ट्य़ांमुळेही नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले आहेत. त्यामुळेही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहन दिसत आहेत. परिणामी वाहतूक कोंडी झाल्याचं पहायला मिळत आहे.
यामुळे ऐरोली टोल नाक्यावर गर्दी होतेय. त्यासाठी चार दिवस टोल माफी असावी यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन करत टोल फ्री केलाय.
टोल नाक्याच्या परिसरात असलेल्या पिवळ्या रेषेच्या बाहेर वाहनांच्या रांगा असल्यास टोल वसुली न करण्याचा नियम आहे. मात्र, असे असले तरीही नियमबाह्य पद्धतीनं टोल वसुली केली जात असल्याचं पहायला मिळत आहे.
मनसेच्या आंदोलनानंतर ऐरोली टोल नाक्यावर टोलमुक्ती