आमदार तानाजी सावंत यांच्या कारने तरुणाला उडवले

बार्शी तालुक्यातील घटना

Updated: Sep 30, 2019, 11:24 AM IST
आमदार तानाजी सावंत यांच्या कारने तरुणाला उडवले title=

सोलापूर : शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार तसेच शिवसेनेचे उपनेते तानाजी सावंत यांच्या कारने तरुणाला उडवले असल्याची घटना घडली आहे. सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील शेलगाव गावात ही घटना घडली. या घटनेनंतर संतप्त जमावाकडून गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. 

तानाजी सावंत यांची कार बार्शीतून शेलगावकडे निघाली होती. त्यावेळी श्याम नावाचा तरुण भाजी घेऊन जात असताना सावंतांच्या वेगवान कारने तरुणाला उडवले असल्याची माहिती मिळत आहे. अपघातावेळी परिसरातील प्रत्यक्षदर्शिंनी तानाजी सावंत गाडीमध्ये असल्याचे सांगितले आहे. पोलिस घटनास्थळी पोहचले आहेत.

या अपघातानंतर तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात येत असताना, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले असून परिस्थिती तणावपूर्ण असल्याची माहिती मिळत आहे.