सातारा : साताऱ्यातल्या सुरुची बंगल्यासमोर झालेल्या राड्याप्रकरणी आमदार शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्त्यांना जामीन मिळालाय.
या कार्यकर्त्यांनी कशाचाही मुलाहिजा न बाळगता थेट रुग्णालयात जल्लोष सुरू केला. या कार्यकर्त्यांच्या या जल्लोषाचा व्हिडिओ समोर आला आहे.
साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसलें यांच्यात आनेवाडी टोलनाक्यावरून वाद आहेत. या वादातून झालेल्या राड्याप्रकरणी आमदारांच्या कार्यकर्त्यांना अटकेत करण्यात आली होती.