Maharashtra Politics: चिन्ह गोठवताच रवी राणा यांचा शिंदेंना मदतीचा हात...

अशातच शिंदे सरकारच्या मदतीला बडनेराचे (Badnera Amravati) आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) धावून आले आहेत. 

Updated: Oct 9, 2022, 10:49 AM IST
Maharashtra Politics: चिन्ह गोठवताच रवी राणा यांचा शिंदेंना मदतीचा हात... title=
mla ravi rana big offers to eknath shinde nmp

Maharashtra Politics: राज्यातील सत्तासंघर्षात रोज नवनवी वळणे घेत असताना निवडणूक आयोगाने (election commission) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा दणका दिली आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण हे राखीव चिन्ह गोठवण्याचा (freezes the symbol) निर्णय घेतल्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवे चिन्हाचा शोध घेत आहेत. 

'गरज पडल्यास...'

अशातच शिंदे सरकारच्या मदतीला बडनेराचे (Badnera Amravati) आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) धावून आले आहेत. रवी राणा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांना थेट मोठी ऑफर दिलीये.. गरज भासल्यास युवा स्वाभिमान पक्ष (Yuva Swabhiman Party) तुम्ही घ्या अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलंय. अमरावती लोकसभा मतदार संघात नवनीत राणा (Navneet Rana) या पाना हे चिन्ह घेऊन निवडून लढत आल्या आहेत. सभी नटो का एक ही पाना असे रवी राणा यांना म्हटलं जाते. (mla ravi rana big offers to eknath shinde nmp)

शिंदे गटातून एक मोठी बातमी...

शिंदे गट देखील या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता आहे. तर आपल्याला तलवार चिन्ह मिळावे यासाठी शिंदे गटाचे प्रयत्न राहणार आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार सोमवारी (10 ऑक्टोबर 2022 ) दुपारी एक वाजेपर्यंत दोन्ही गटांना अपेक्षित असलेले पण आयोगाकडे उपलब्ध असलेल्या मुक्त चिन्हापैकी तीन चिन्हांचा पर्याय द्यावा लागणार आहे. शिंदे गट त्यांना पाहिजे असलेल्या तलवार या चिन्हांचा पर्याय देण्याची शक्यता आहे. निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्यायचे किंवा कसे, याबाबत पक्षाच्या कायदेविषयक सल्लागारांशी चर्चा करण्यात येणार आहे. तसंच चिन्हाबाबत काय करता येईल याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल. 

दरम्यान आता अंधेरी पोटनिवडणुकीसाठी (Andheri Bypoll Election) शिवसेनेचं चिन्ह गोठवण्यात आलं आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाची पुढची वाटचाल कशा प्रकारे आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.