औरंगाबाद : सुप्रीम कोर्टाचा अर्जुन खोतकरांना दिलासा दिलाय. शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतखरांची आमदारकी कोर्टाने रद्द केली होती. मात्र त्यांना कोर्टाकडून दिलासा मिळालाय. खोतकर यांनी निवडणूक अर्ज वेळेत न भरल्याने त्यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका कैलाश गोरंट्याल यांनी दाखल केली होती.
शिवसेना आमदार अर्जुन खोतकरांची आमदारकी रद्द करण्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे अर्जुन खोतकर यांची आमदारकी आणि मंत्रीपद कायम राहणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती नलावडे यांनी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे आमदार पद अपात्र घोषित केले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी खोतकर यांनी वेळ निघून गेल्यानंतर स्थानिक उपविभागीय अधिका-यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे ते निवडणूक लढविण्यास पात्रच नव्हते, असे याचिकेत नमूद होते.
अर्जुन खोतकर हे मराठवाड्यातील शिवसेनेचे मोठे नेते असल्याने सेनेनाल हा मोठा धक्का मानला जात आहे. जालना जिल्ह्यात अर्जुन खोतकरांनी शिवसेना चांगलीच मजबूत केली आहे. त्यामुळे या नेत्याची आमदारकी रद्द होणे शिवसेनेला मोठा दणका मानला जात आहे. आता ते सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असून यावर काय निर्णय येईल याकडे सर्वांचे लक्ष असेल.