एमआयएम नगरसेवकाला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मतिनच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबाद पालिकेबाहेर गाड्यांची तोडफोड केली होती.

Updated: Aug 20, 2018, 06:37 PM IST
एमआयएम नगरसेवकाला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी  title=

औरंगाबाद : औरंगाबाद मनपाबाहेर तोडफोड केल्याप्रकरणी एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन याला अटक करण्यात आली आहे. त्याला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यास विरोध करणाऱ्या मतीनला भाजपा नगरसेवकांनी मारहाण केली होती. याप्रकरणी भाजपा नगरसेवकांनाही काही वेळापूर्वी अटक करण्यात आली. मतीनला मारहाण केल्यानंतर त्याच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबाद पालिकेबाहेर गाड्यांची तोडफोड केली होती. याप्रकरणी सय्यद मतीन याला अटक करण्यात आली आहे.

पाचजणांना अटक  

 सभागृहात अमानुष मारहाण झाल्याच्या मतीनच्या तक्रारीवरुन भाजप गटनेते प्रमोद राठोड, उपमहापौर विजय औताडे, नगरसेवक राजगौरव वानखेडे, माधुरी अदवंत आणि रामेश्वर भादवेंविरोधात गुन्हा दाखल झालाय. या पाचही नगरसेवकांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे.

पोलीस तैनात

याच गुन्ह्यात या सगळ्यांना अटक होण्याची शक्यता आहे. एमआयएमच्या मतीनला अटक झाली मात्र भाजप नगरसेवकांना का नाही यावरुन चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या या नगरसेवकांना नुकतीच अटक करण्यात आली आहे. सध्या तरी लोकांना याबाबत माहिती मिळाली नाही. पण ही बातमी पसरताच मोठी गर्दी होऊ शकते. या पार्श्वभूमीवर पोलीस तैनात करण्यात आले आहेत.