राज्यात सोमवारी मध्यरात्रीपासून दूध आंदोलनास सुरू : राजू शेट्टी

अतिरिक्त झालेल दूध महानंद तर्फे २७ रूपये प्रीलिटरने खरेदी करावे अशा मागण्यासाठी राज्यात दूध दरवाढ आंदोलन सुरू होणार आहे.

Updated: Jul 15, 2018, 11:16 AM IST
राज्यात सोमवारी मध्यरात्रीपासून दूध आंदोलनास सुरू : राजू शेट्टी title=

सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर: दूध दरात ३ रुपयांची वाढ केल्यानतंरही राजू शेट्टी दूध आंदोलनावर ठाम आहेत. पंढरपुरातून ते आपल्या आंदोलनाची सुरुवात करतील. विठ्ठलास दुग्धाभिषेक करुन विठुरायाचं दर्शन घेऊन ते आंदोलनाची सुरुवात रविवारी मध्यरात्रीपासून करतील. अतिरिक्त उत्पादन झालेली दुधाची पावडर आणि बटर बाबत निर्णय घ्यावा. राज्य सरकारने या दूध बाजारात हस्तक्षेप करावा. अतिरिक्त झालेलं दूध महानंद तर्फे २७ रूपये प्रीलिटरने खरेदी करावे अशा मागण्यासाठी राज्यात दूध दरवाढ आंदोलन सुरू होणार आहे.

शेतकरी संघटना आक्रमक 

राज्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांना हक्काच्या दुधाला भाव मिळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. पंढरपूरमधून केलेल आंदोलनास यश मिळते. सोमवार पासून दूधदरवाढ आंदोलन हुरू होणार असले तरी या आंदोलनाचा प्रारंभ रविवारी मध्यरात्री श्री विठ्ठलाच्या मुर्तीस दुग्धाभिषेक करून या आंदोलनाची सुरूवात खासदार राजू शेट्टी करणार आहेत. अतिरिक्त उत्पादन झालेली दुधाची पावडर व बटर बाबत निर्णय घ्यावा. दूध निर्यातीस वाव नसल्याने निर्यात अनुदान देण्याचा कसलाच फायदा नाही. राज्य सरकारने या दूध बाजारात हस्तक्षेप करावा. अतिरिक्त झालेल दूध महानंद तर्फे २७ रूपये प्रीलिटरने खरेदी करावे अशा मागण्यासाठी राज्यात दूध दरवाढ आंदोलन सुरू होणार आहे.

दुधाला प्रिती लिटर ३ रूपायंची दरवाढ

दरम्यान, शेतकऱ्यांच्या दुधाला प्रती लिटर तीन रुपयांची दरवाढ देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पुण्यात काल (शनिवार,१४ जुलै) संध्याकाळी आयोजित राज्यभरातील सहकारी आणि खासगी दूध उत्पादक संघांच्या महत्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जीएसटी कमी झाल्यास दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला आणखी एक रुपया वाढवून देण्याचाही निर्णय या बैठकीत झाला. या दरवाढीचा ग्राहकांवर काहीही परीणाम होणार नाही. सोमवार १६ जुलैपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दूध बंद आंदोलन पुकारलं आहे. त्या पार्श्वभूमीवर तातडीनं ही बैठक बोलावली गेली होती.