मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC)चे सर्व्हर हॅक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. हॅकर्सने महामंडळाच्या अधिकृत ईमेल आयडीवर मोठ्या रकमेची मागणी केली असल्याचे सांगितले जात आहे.
MIDC च्या सर्व्हरवरील सर्व महत्वाचा डेटा नष्ट करण्याची धमकीही हॅ्कर्सकडून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हॅकर्सने महामंडळाला ईमेल करून 500 कोटींची मागणी केल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.
सर्व्हर हॅक झाल्याने राज्यातील मुंबईतील मुख्यालयासह 16 प्रादेशिक कार्यालयातील संपूर्ण कामकाज बंद पडले आहे..