थकित कर्जवसुलीसाठी म्हाडाची शक्कल; मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गालगत बांधणार म्हाडाची घरं

मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गालगत म्हाडाची घरं निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हाडाने एमएसआरडीसीकडे कर्ज परतफेडीऐवजी जमीनीची मागणी केली आहे. 

Updated: Dec 19, 2023, 11:46 PM IST
थकित कर्जवसुलीसाठी म्हाडाची शक्कल;  मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गालगत बांधणार म्हाडाची घरं   title=

Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg : एमएसआरडीसीकडील थकित कर्जवसुलीसाठी म्हाडाने शक्कल लढवली आहे. एमएसआरडीसीच्या अंतर्गत येणाऱ्या  मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गालगतच्याजमीनीवर म्हाडा घर बांधणार आहे. यामुळे येत्या काही वर्षात  मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गालगत म्हाडाच्या वसाहती दिसू शकतात. यामुळे महाराष्ट्रात नविन घरांची निर्मीती होणार आहे. 

मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गालगत म्हाडाची घरं निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हाडाने एमएसआरडीसीकडून एक हजार कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं. हे कर्ज थकीत असून त्या मोबदल्यात म्हाडाने एमएसआरडीसीच्या नवनगर प्रकल्पात जमिनी देण्याचा प्रस्ताव पाठवलाय. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास म्हाडाला 701 किमी दरम्यान जमिनी मिळाल्या तर भविष्यात समृद्धीनगर म्हाडाची घरे निर्माण होतील आणि सर्वसामान्यांना ती सोडतीद्वारे उपलब्ध होतील.

समृद्धी महामार्गाचा 600 किमीचा टप्प्याचं काम पूर्ण झालं असून म्हाडा सातत्याने कर्जाच्या परतफेडीसाठी एमएसआरडीसीकडे पाठपुरावा करत आहे. मात्र, सरकारने या कर्जाचं रुपांतर समभागात करण्याचा निर्णय घेतलाय...तर, समभागाऐवजी समृद्धीलगतच्या नवनगरांमध्ये गृहनिर्मितीसाठी जमिनींची मागणी म्हाडाने केलीये.

छत्रपती संभाजी नगर गृहनिर्माण मंडळ अल्प उत्पन्न गटासाठी  घरं बांधणार

म्हाडाच्या छत्रपती संभाजी नगर गृहनिर्माण मंडळ अल्प उत्पन्न गटासाठी अतिरिक्त 1 हजार घरं बांधणारेय. त्यासाठी निवीदा मागवण्याचं काम सुरूये. पुढील 24 महिन्यांमध्ये घरांचं काम पुर्ण होण्याची शक्यता आहे.

ठाण्यात म्हाडाची एक हजार घरं

‘म्हाडा’च्या कोकण मंडळाला पुढच्या वर्षी  ठाण्यातल्या चितळसर मानपाड्यात 1 हजार 173 घरं उपलब्ध होणार आहेत. मानपाड्यातील ‘स्विस चॅलेंज प्रकल्पातून म्हाडाच्या जागेवर खासगी विकासक घरं बांधून देणारेय. सध्या या प्रकल्पाचं 90 टक्के काम पूर्ण झालंय.

सेवाशुल्क माफ करण्याचा म्हाडाचा निर्णय

मुंबईतील म्हाडाच्या  56 वसाहतींतील सहकारी गृहनिर्माण संस्थांकडील 1998 ते 2021 कालावधीतील वाढीव सेवाशुल्क माफ करण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतलाय. त्यामुळे जवळपास 380.41 कोटींचं वाढीव सेवाशुल्क माफ होणारेय. मुंबईतील ५० हजार सदनिकाधारकांना दिलासा मिळणारेय. गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांनी याबाबत माहिती दिली.