आता मुंबईत जमीन विकत घेऊन बांधा घर; म्हाडा घेऊ शकते मोठा निर्णय, नियम- अटी जाणून घ्या

Mhada Plots News: म्हाडा लवकरच आता प्लॉट विकण्याचा निर्णय घेणार आहे. मुंबईत याबाबत अधिकाऱ्यांकडून परीक्षण करण्यात येत आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 7, 2024, 04:16 PM IST
आता मुंबईत जमीन विकत घेऊन बांधा घर; म्हाडा घेऊ शकते मोठा निर्णय, नियम- अटी जाणून घ्या title=
Mhada Mumbai Board Plans To Auction Its Vacant Plots in mumbai

Mhada Plots News: महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणच्या (म्हाडा) मुंबई बोर्डाने प्लॉटचा लिलाव करण्याची योजना आखली आहे. म्हाडाला जो सर्वाधीक ऑफर देईल त्याला ती जमीन देण्यात येईल. सर्व विभागाच्या अधिकाऱ्याने त्यांच्या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या प्लॉटची माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्लॉटची माहिती मिळाल्यानंतर त्या क्षेत्रानुसार त्याची किंमत ठरवली जाईल. किंमत ठरवल्यानंतर त्याचा लिलावासाठी जाहिरात काढण्यात येणार आहे. हे प्लॉट मुंबईतील वेगवेगळ्या भागात असणार आहेत, अशी माहिती म्हाडाने दिली. 

मुंबईत म्हाडाच्या अनेक प्लॉटवर शाळा, कॉलेज, रुग्णालय, खेळाची मैदाने आणि मनोरंजन कार्यांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. मात्र, हे प्लॉट गेल्या कित्येक वर्षांपासून विनावापर पडून आहेत. या जामिनींवर कोणतेही निर्माण कार्य करण्यात आलेले नाहीये. त्यामुळं या खाली जमीनींवर अतिक्रमण करण्यात येते. त्यामुळं हे अतिक्रमण हटवण्यासाठी व अन्य समस्यांचा सामना म्हाडाला करावा लागतो. त्यामुळं या समस्यांपासून सुटका करण्यासाठी म्हाडाने काही अटी व शर्तीसह आपले आरक्षित प्लॉट विकण्याची योजना आखली आहे. 

म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, प्लॉटच्या विक्रीनंतरही तिथे आरक्षण जारी असेल. ग्राहकांनी प्लॉट घेतल्यानंतर आरक्षणाअंतर्गंतच त्या जमीनीचा वापर करावा लागेल. प्लॉटच्या विक्रीनंतर मुंबई बोर्डाच्या आर्थिक स्थिती सुधारणाही होऊ शकते. मागील वर्षी म्हाडाच्या मुंबई बोर्डाने 4 हजार 082 घरांची लॉटरी काढली होती. या वर्षी जवळपास 2 हजार घरांसाठी लॉटरी जारी करण्याचा प्रयत्न असून त्यावरच काम सुरू आहे. 

600 घरांसाठी म्हाडा लॉटरी काढणार 

मुंबईत हक्क्याच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी मुंबई मंडळ लवकरच पुन्हा एकदा लॉटरी काढणार आहे. मुंबई मंडळ 600 घरांसाठी लॉटरी काढण्याची घोषणा करण्याती शक्यता आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात काढण्यात येणाऱ्या लॉटरीमधून शिल्लक राहिलेल्या 600 घरे नव्या लॉटरीमध्ये सहभागी करणार आहेत. मुंबई बोर्डाने या योजनेसाठी परीक्षणदेखील करण्यात सुरुवात केली आहे. एप्रिलमध्ये लाँच होणाऱ्या या नव्या लॉटरीमध्ये अन्य काही घरांना सामील केले जाता येईल की नाही याचे परीक्षण करण्यात येणार आहे. 

दरम्यान, ऑगस्ट महिन्यात म्हाडा मुंबई मंडळाने 4 हजार 82 घरांसाठी लॉटरी काढली आहे. यासाठी 1 लाख 22 हजार अर्जदारांनी घरासाठी अर्ज केले होते. पहाडी गोरेगाव पंतप्रधान आवास योजनेअंतर्गंत 22 हजार 472 अर्ज प्राप्त झाले होते. तसंच, उत्पन्न गटानुसार, अत्यल्प उत्पन्न गटातील 843 घरांसाठी 28,862 अर्ज प्राप्त झाले आहेत.