Rajan Salvi : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी पुन्हा रायगड ACB समोर

Rajan Salvi at Raigad  :  आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांची पुन्हा एकदा चौकशी करण्यात येणार आहे. (Maharashtra Political News ) आज ते पुन्हा रायगड एसीबीसमोर ( Raigad ACB ) हजर राहणार आहेत. 

Updated: Jan 20, 2023, 11:44 AM IST
Rajan Salvi : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी पुन्हा रायगड ACB समोर  title=

Rajan Salvi Raigad ACB : शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांची चौकशी करण्यात येत आहे. याआधी त्यांची एकदा चौकशी करण्यात आली होती. (Maharashtra Political News ) आज पुन्हा रायगड एसीबीसमोर ( Raigad ACB ) राजन साळवी (Rajan Salvi News) हे हजर राहणार आहेत. एसीबीने मागितलेली माहिती आणि कागदपत्रे साळवी सादर करणार आहेत. ( Maharashtra News in Marathi)

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर मतदार संघातील शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार राजन साळवी आज पुन्हा रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागासमोर हजर राहणार आहेत. बेकायदा मालमत्ता जमवल्याच्या आरोपावरून साळवी यांची एसीबी चौकशी सुरु करण्यात आली आहे. 

14 डिसेंबर रोजी साळवी पहिल्यांदा एसीबी समोर हजर राहिले. त्यावेळी त्यांची साडेपाच तास चौकशी झाली. एसीबीला आवश्यक उर्वरित माहिती आणि कागदपत्रे सादर करण्यासाठी साळवी यांनी 20 जानेवारीपर्यंतची मुदत मागितली होती. त्यानुसार ते आज सकाळी 11 वाजल्यानंतर आलिबाग येथील एसीबी कार्यालयात उपस्थित राहणार आहेत.

राजन साळवी यांची निर्दोष मुक्तता 

दरम्यान, केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान पोस्टर फाडल्याचे प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार आणि उपनेते राजन साळवी यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. साळवी यांच्यासह सहा जणांची निर्दोष मुक्तता  केली. त्यांच्याविरोधात सबळ पुरावे अभावी रत्नागिरी येथील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.  निकालानंतर आमदार राजन साळवी यांनी रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायालय निकालानंतर न्यायदेवतेचे आभार मानले.