मर्सिडिझ बेंझ कंपनी महाराष्ट्रात 3000 कोटींची गुंतवणूक करणार; हजारो तरुणांना नोकऱ्या मिळणार

मर्सिडिझ बेंझ कंपनी यावर्षी महाराष्ट्रामध्ये 3 हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची माहिती, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jun 13, 2024, 10:29 PM IST
मर्सिडिझ बेंझ कंपनी महाराष्ट्रात 3000 कोटींची गुंतवणूक करणार; हजारो तरुणांना नोकऱ्या मिळणार title=

mercedes benz company investment in maharashtra :  मर्सिडिझ बेंझ कंपनी यावर्षी महाराष्ट्रामध्ये 3 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोसल मिडियावर एक पोस्ट शेअर करत ही  माहिती दिली.   मर्सिडिझ बेंझ कंपनीच्या गुंतवणकीमुळे महाराष्ट्रात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्रातील हजारो तरुणांना नोकऱ्या मिळणार मिळणार आहेत. 

जर्मनी दौऱ्यावर असताना मर्सिडिझ बेंझ कंपनीच्या प्रतिनिधीसोबत बैठक झाली.  मर्सिडिझ बेंझ ही कंपनी यावर्षी महाराष्ट्रामध्ये 3000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. यामुळे महाराष्ट्रात उद्योगधंद्यांसह रोजगारात मोठ्या संख्येने वाढ होणार आहे. यासंदर्भात आज चर्चा झाली. यावेळी मर्सिडीज कंपनीचे मर्सिडीज-बेंझ ग्रुप ऑफ मॅनेजमेंट बोर्डाचे सदस्य डॉ. जोर्ग बर्झर,  पॉलिटिकल ऑपरेशन्स - एक्सटर्नल अफेयर्स, मर्सिडीज-बेंझ ग्रुप एजी संचालक श्रीमती मरिना क्रेट्स, विक्री आणि विपणन, प्रदेश ओव्हरसीज, मर्सिडीज-बेंझ ग्रुप एजी संचालक श्री. मार्टिन शुल्झ, मर्सिडीज-बेंझ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कार्यकारी संचालन प्रमुख श्री. व्यंकटेश कुलकर्णी आदी उपस्थितीत होते अशी पोस्ट उदय सामंत यांनी केली आहे.