मुख्यमंत्र्यांना भेटलो, पण भाजपमध्ये जाणार नाही - अब्दुल सत्तार

 औरंगाबादमधून उमेवारी न मिळाल्याने माजी मंत्री अब्दुल सत्तार नाराज आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेतली. 

Updated: Apr 4, 2019, 04:46 PM IST
मुख्यमंत्र्यांना भेटलो, पण भाजपमध्ये जाणार नाही - अब्दुल सत्तार title=

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी औरंगाबादमधून उमेवारी न मिळाल्याने माजी मंत्री अब्दुल सत्तार नाराज आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेतली. त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरु झाली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अब्दुल सत्तार यांनी स्पष्टीकरण दिले आहे की, मी काँग्रेसमध्येच राहणार  भाजपमध्ये जाण्याचा प्रश्न येत नाही. काँग्रेसमध्ये असलो तरी मी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार आहे. ८ एप्रिल रोजी मी माझा निर्णय घेणार आहे, असे सत्तार म्हणालेत. दरम्यान, सत्तार यांच्या निर्णयानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. सत्तार यांचा निर्णय हा आत्महघातकी असेल, असे ते म्हणालेत.

भाजपमध्ये जाणार नाही मात्र काँग्रेसचाही प्रचार करणार नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस बंडखोर अब्दुल सत्तार यांनी मुंबईत दिली. अपक्ष उमेदवारीबाबत ८ एप्रिलला निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. काल रात्री त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. तर भाजपत जाण्याचा अब्दुल सत्तार यांचा निर्णय आत्मघातकी ठरेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या घडामोडीवर दिली. नाराज आमदार अब्दुल सत्तार यांनी अखेर लोकसभेसाठी औरंगाबाद मतदारसंघातून अर्ज भरला आणि काँग्रेसविरोधात दंड थोपटले. 

काँग्रेसविरोधात प्रचार करणार आणि काँग्रेसला नमवणार, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. औरंगाबाद आणि जालन्याच्या उमेदवारीवरून सत्तार नाराज होते. सत्तार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने याचा फायदा हा शिवसेना - भाजपच्या युतीच्या उमेदवाराला होण्याची शक्यता आहे. मतविभाजनाचा फटका हा काँग्रेसला बसलण्याची शक्यता आहे. औरंगाबादमध्ये काँग्रेसची उमेदवारी सुभाष झांबड यांना उमदेवारी जाहीर झाल्यानंतर सत्तार यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत बंडाचे निशाण फडकावले आहे.