उल्हासनगर : एल्फिन्स्टन चेंगराचेंगरी दुर्घटनेत जीव गमावलेल्या उल्हासनगरच्या मीना व्हालेकर यांचे कुटुंबीय अजूनही या धक्क्यातून सावरलेले नाहीत. त्या दुर्दैवी घटनेत व्हालेकर कुटुंबातली एकमेव कर्ती स्त्री मृत्यू पावल्यानं, घरातल्या एकाला रेल्वेत नोकरी देण्याची मागणी व्हालेकर कुटुंबीयांनी केली आहे.
वडिलांचं छ्त्र हरपल्यानंतर, आई आणि दोन लहान भाऊ यांची जबाबदारी मीना यांच्यावरच होती. आपल्यावरची हीच जबाबदारी ओळखून मीना व्हालेकर यांनी लग्न केलं नव्हतं. ३५ वर्षीय मीना महाराष्ट्र कामगार मंडळात सहाय्यक अधीक्षक पदावर कार्यरत होत्या.
नुकतीच त्यांना बढती मिळणार असल्यानं, व्हालेकर कुटुंबीय आनंदात होते. मात्र त्याआधाची काळानं त्यांच्यावर घाला घातला. रेल्वेनं जाहीर केलेली ५ लाखांची मदत मिळाली, मात्र राज्य सरकारनं काहीच दखल घेतली नसल्याचं व्हालेकर कुटुंबानं सांगितलं.