Mazi Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनाला राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना गिफ्ट मिळणार आहे.. रक्षाबंधनाआधीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मानधन एकत्रितरित्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहेत. रक्षाबंधनची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी अपडेट समोर आली आहे. अर्ज अप्रूव्ह झाला तरी महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. यासाठी बँक खात्याचे KYS झालेले असणे गरजेचे आहे.
रक्षाबंधनाआधीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मानधन एकत्रितरित्या बँक खात्यावर जमा होणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. महिलांनी लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज दाखल करावेत असं आवाहनही अजित पवारांनी केले आहे. तसंच लाडकी बहीण योजनेअंतर्गत पहिला निधी रक्षाबंधनाच्या दरम्यान दिली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.
जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात केली होती. दरवर्षी योजनेसाठी 46 हजार कोटीचा निधी उपलब्ध केला जाणार आहे. 21 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. ज्यांच्या कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत सुमारे 1 कोटी 45 लाख 76 हजार महिलांनी नोंदणी केलेली आहे. आणि त्यातील एकूण 1 कोटी 34 लाख 30 हजार 784 अर्ज पात्र ठरले आहेत. दरम्यान 27 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत.
अर्ज अप्रूव्ह झाला तरी 27 लाख महिलांच्या खात्यात लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा होणार नाहीत. कारण, या अर्जदार महिलांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले नाही. यामुळे यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. तसेच 31 ऑगस्ट, 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 01 जुलै, 2024 पासून दर माह रु.1500/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.