माया वाघिणीने पर्यटक जिप्सीवर चढाई केली...पण पर्यटक बचावले

 नुकत्याच पुढे आलेल्या एका व्हीडिओ माया वाघिणीचे रौद्र रुप अनुभवल्याचं पुढे आलं आहे. 

Jaywant Patil Updated: Apr 10, 2018, 12:52 PM IST

चंद्रपूर : उन्हाळ्यात वाघाचं दर्शन होणं तसं नेहमीचंच. पण चंद्रपूरमधल्या ताडोबाच्या जंगलात माया नावाची वाघीण सध्या पर्यटकांमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली आहे. आपल्या बछड्यांसोबत जंगलभर मुक्त संचार करणाऱ्या माया वाघिणीच्या दर्शनानं अनेक पर्यटकांना व्याघ्र दर्शनाचा आनंद दिला आहे. पण नुकत्याच पुढे आलेल्या एका व्हीडिओ माया वाघिणीचे रौद्र रुप अनुभवल्याचं पुढे आलं आहे. अशातच हिलटॉप भागातील एका घटनेने पर्यटक धास्तावले आहेत. या भागात माया या मायाळू वाघिणीने पर्यटक जिप्सी निरखून चक्क चढाईची तयारी केली.  

गाडीत बसलेल्या पर्यटकांना मात्र चांगलाच घाम फुटला

पर्यटकांची घाबरगुंडी उडाली. माया गाडीवर उडी घेण्याच्या तयारीत असताना गाडीत बसलेल्या पर्यटकांना मात्र चांगलाच घाम फुटला. मायाच्या मागे चालत येणा-या बछड्यांसाठी कदाचित आईने मार्ग मोकळा करून दिला असेल. 

जिप्सी चालकाने सफाईदारपणे वाहन पुढे नेले

माया आणि बछडे यांचे हे कुटुंब पर्यटकांनी डोळ्यात साठविले. मात्र मायाचा आक्रमक मूड ओळखून जिप्सी चालकाने सफाईदारपणे वाहन पुढे नेले आणि घटना टळली. या वायरल व्हिडिओवरून ताडोबात फिरताना पर्यटकांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त झाली आहे.