Maharashtra Temple Corona : भविकांसाठी मोठी बातमी! सप्तशृंगीसह 'या' मंदिरात मास्क सक्ती

Maharashtra Temple Corona : वर्षाखेर सर्वच भक्त हे देवदर्शनासाठी गर्दी करू लागले आहेत. परंतु कोरोनानं (Corona Outbreak in China) पुन्हा एकदा डोकं वर काढल्यानं आता सगळीकडे मास्क सक्ती सुरू झाली आहे.

Updated: Dec 27, 2022, 01:33 PM IST
Maharashtra Temple Corona : भविकांसाठी मोठी बातमी! सप्तशृंगीसह 'या' मंदिरात मास्क सक्ती title=
Mask Mandatory

Maharashtra Temple Corona​ : वर्षाखेर सर्वच भक्त हे देवदर्शनासाठी गर्दी करू लागले आहेत. परंतु कोरोनानं (Corona Outbreak in China) पुन्हा एकदा डोकं वर काढल्यानं आता सगळीकडे मास्क सक्ती सुरू झाली आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगीगडपाठोपाठ आता नाशिकमधील ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये (Kalaram Mandir) मास्क बंधनकारक करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर (Tryambkeshwar) यासोबतच सप्तशृंगी (Saptashrungi) गडापाठोपाठ नाशिकमधील ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये आता मास्क सक्ती करण्यात आली आहे.

कोरोनाने चीनमध्ये पुन्हा एकदा डोकं वर काढल्याने भारत सरकार व राज्य सरकार देखील केंद्राने दिलेल्या निर्देशानुसार, राज्य सरकारकडून नियमावली यासोबतच कोरोनाच्या बचावासाठी वेगवेगळ्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आला आहे. (Masks now compulsory at historic Kalaram Temple Nashik followed by Trimbakeshwar and Saptshringi temple vani latest corona update marathi news)

त्यामुळेच मंदिर प्रशासन देखील येणाऱ्या भाविकांसाठी मार्क्सची करू लागला आहे. राज्यातील वेगवेगळ्या मंदिरांमध्ये मास्क सक्ती झालीये तर नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये देखील मास्क सक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे पत्रक देखील मंदिर प्रशासनाच्या वतीने काढण्यात आले आहे. 

हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरातही मास्क सक्ती :

अमेरिका व चीनसह (America corona outbreak) भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क झाला असून औंढा नागनाथ मंदिर संस्थानच्या वतीने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मास्कची सक्ती केली आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे असलेल्या श्री नागनाथ मंदिरात नाताळ सणाच्या सुटीमुळे मोठ्या प्रमाणात येणारे पर्यटक व भाविकांत वाढ झाली होती. त्यामुळे मंदिर प्रशासनाच्या वतीने कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून भाविकांना मास्क सक्ती करण्यात आली आहे. यापुढे मंदिरात येणाऱ्या भाविकांना मास्क वापरणे (Mask Complusory) बंधनकारक असणार आहे.

हेही वाचा - Anil Kapoor : 'या' अभिनेत्रीसाठी आपल्या बायकोलाही सोडायला तयार होते अनिल कपूर?

लग्न झालेल्या मंडळींनी दर्शनासाठी येताना मास्क बंधनकारक 

या रविवारपासून देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिर येथे दरवर्षी नित्यनियमानं येणाऱ्या भाविकांना आणि मंदिर संस्थानातील कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती केली. या नियमासोबत मंदिरात गर्दी न करण्याचे आवाहनही देण्यात आले आहे. रविवारी मास्क घालून बहुतांश भक्त आले होते. कालही संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी मास्क वापरून कामकाज पार पाडले असल्याची माहिती कळते. लग्न झालेली जोडपीही दर्शनासाठी आवर्जून हजर राहत आहेत त्यामुळे त्यांच्यासाठीही मास्कसक्ती करण्यात आली आहे. 

त्र्यंबकेश्वरला मास्क सक्तीला थंड प्रतिसाद? 

समोर आलेल्या माहितीनुसार, शनिवारी मास्क सक्तीचे आदेश दिल्यानंतर भाविकांना मास्क लावण्याला थंड प्रतिसाद दिला. त्यामुळे पहिल्या दिवशीच नागरिकांनी नियम पाळले नाहीत. काहींना रांगेत उभं असताना ओढणी किंवा रूमाल लावण्याचा प्रयत्न केला. पण मंदिरात प्रवेश मिळाल्यानंतर त्यांनी तेही काढून टाकले. काहींना रांगेचेही नियम मोडले आणि संस्थानमधल्या कर्मचाऱ्यांशी आणि सुरक्षारक्षकांशी वादही घातल्याचे समोर आले. मंदिराच्या गर्भागृहातील त्रिकाल पूजा सोडून अन्य भक्तांना प्रवेश बंद असण्याचीही शक्यता आहे.