मुंबई : कोरोनाचा आकडा पुन्हा एकदा वाढू लागलाय. काल राज्यभरात 1134 रूग्ण आढळले होते. यानंतर पुन्हा राज्यात मास्क वापरणं बंधनकारक असण्याचं सांगण्यात आलंय. गर्दीच्या ठिकाणी राज्यात मास्क लावणं आता बंधनकारक असणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळा, कॉलेज, रेल्वे, सिनेमागृह अशा गर्दीच्या ठिकाणी मास्क बंधनकारक असणार आहे. एकंदरीत कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने मास्कसक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलंय. या पत्रामध्ये राज्यात गर्दीच्या ठिकाणी मास्क बंधनकारक असल्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. यामध्ये रेल्वे, बसेस तसंच सिनेमागृह अशा गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणं बंधकारक असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान देशात कोरोनाचं वाढतं प्रमाण पाहता केंद्र सरकार सतर्क झालंय. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी शुक्रवारी पाच राज्यांना पत्र लिहिलं होतं. यामध्ये तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्राचा समावेश आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, केरळमधील 11 जिल्हे, तामिळनाडूतील 2 जिल्हे, महाराष्ट्रातील 6 जिल्हे, कर्नाटक आणि तेलंगणातील एका जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यातील रुग्णसंख्या ही चिंताजनक असल्याचं केंद्राने म्हटलंय. या जिल्ह्यामंध्ये टेस्टिंग आणि लसीकरण वाढवण्यावर भर देण्यात यावा, याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नवीन कोरोना व्हेरियंट यावर लक्ष द्यावे, असेही निर्देश दिले गेले आहेत.