Gunratna Sadavarte : मराठे मागास असल्याचं सिद्ध होणार नाही, असा पुनरुच्चार वकिल गुणरतन सदावर्ते यांनी केला आहे. जरांगेंनी राजकीय पक्ष काढावा, मात्र ज्याला त्याला कलंकित म्हणू नये, असं सदावर्तेंनी म्हटलंय. तसंच मराठा आरक्षणावर क्युरेटीव्ह पिटीशनचा काही उपयोग होणार नाही, असं सदावर्तेंनी म्हटलंय.
मुख्य न्यायमूर्तींसमोर क्युरेटीव्ह पिटीशन वर सुनावणी होईल. सुनावणी ओपन कोर्टात होणार नाहीये इन चेंबर होईल. केवळ क्वेश्चन ऑफ लॉ च्या आधारावर सुनावणी होईल क्वेश्चन ऑफ फॅक्टच्या आधारावर नाही. या आधीच आयोगांनी स्पष्ट केले की मराठा समाज मागास होत नाही. क्युरेटीव्ह पिटीशन मधून नव्याने काही मिळणार नाही. मराठा आरक्षण मागासले पण उद्या ठरणार नाही. यांना मागास ठरवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. कायदा केल्यास सर्वोच्च न्यायालयाचा तो अवमान असेल. केवळ एखाद्या नोंदीच्या आधारे मागास ठरवता येणार नाही असेही सदावर्ते म्हणाले. या प्रकरणांमध्ये राज्य सरकारला कायदा करता येणार नाही. मागासवर्ग आयोगाचे सदस्य राजीनामा देतात हे काय चाललय राज्यात. हस्तक्षेप वाढला आहे असं बोललं जातंय.
जरांगे म्हणतात लायकी नाही ही कोणती भाषा आहे कलंकित मंत्री म्हणणे हे ब्रिज ऑफ पीस आहे जरांगे यांनी राजकीय पक्ष काढावा. मंत्रालयाला कुलूप लावणे हे ब्रिज ऑफ प्रेविलेज आहे सभापतींनी उत्तर द्यावे. राज्य सरकारला कायदा करता येणार नाही कोणत्याच आयोगाने मराठा समाज मागास आहे असं म्हटलं नाहीये. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत राजकारण करू पाहत आहेत. जरांगेने राजकारण कराव पक्षाची घोषणा करावी पण कलंकित, बघून घेऊ अशी भाषा करू नये असे जरांगे म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी निकराची लढाई सुरु केलीय. मराठा समाज आरक्षणासाठी ताकदीनं रस्त्यावर उतरलाय. दुस-या बाजूला मराठा आरक्षण आंदोलनाच्या विरोधात वकिल गुणरत्न सदावर्तेंनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केलीय. हिंसक आंदोलकांविरुद्ध कारवाई करा, त्यांच्याकडून नुकसानभरपाई घ्या, अशी मागणी करणारी याचिका सदावर्ते यांनी हायकोर्टात दाखल केली आहे.