मराठा आंदोलकांचा लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या

लोकप्रतिनिधींच्या कार्यालयासमोर ही मराठा आदोलंकांचा ठिय्या.

Updated: Aug 2, 2018, 02:30 PM IST
मराठा आंदोलकांचा लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या title=

पुणे : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुण्यात लोकप्रतिनिधींच्या घर आणि कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरासमोर सकाळी आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं. सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या कार्यालयासमोर दुपारी आंदोलन करण्यात येणार आहे.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हे ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. त्याचबरोबर यावेळी आंदोलकांनी घंटानाद देखील केला. सरकारला जागं करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचं आंदोलकांनी म्हटलं आहे.

आरक्षणाच्या मागणीसाठी परळी येथे मागील सोळा दिवसापासून सुरु असलेल्या आंदोलनस्थळी आज राज्यातील मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची बैठक होत आहे. राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाची पुढील दिशा यामध्ये ठरू शकते. आरक्षणावरून राज्यातील वेगवेळ्या भागात जी आंदोलने सुरू आहेत त्यांची सुरुवात परळी येथून झाली होती. परळी येथे सोळा दिवसापासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे राज्यात आरक्षणाचा वणवा पेटला. याठिकाणी पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्यासह अनेक राजकीय पुढाऱ्यांनी भेटी देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला होता.