बीड : आरक्षणाच्या मागणीसाठी परळी येथे मागील सोळा दिवसापासून सुरु असलेल्या आंदोलनस्थळी आज राज्यातील मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची बैठक होl आहे. राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाची पुढील दिशा यामध्ये ठरू शकते. आरक्षणावरून राज्यातील वेगवेळ्या भागात जी आंदोलने सुरू आहेत त्यांची सुरुवात परळी येथून झाली होती. परळी येथे सोळा दिवसापासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे राज्यात आरक्षणाचा वणवा पेटला. याठिकाणी पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्यासह अनेक राजकीय पुढाऱ्यांनी भेटी देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला होता.
मराठवाड्याचे आयुक्त देखील दोन वेळा या ठिकाणी गेले होते. तरीदेखील आंदोलन सुरूच आहे. दरम्यान आज याठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व समनवयकांची बैठक होणार आहे. या बैठकीकडे सरकारसह सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज मुख्यमंत्र्यांनी देखील मराठा समाजाच्या मान्यवरांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला बरेच मराठा मान्यवर उपस्थित होते. तर आमंत्रित केल्या गेलेल्या अनेक मान्यवरांनी हा बैठकीकडे पाठ फिरवली.