पुणे: सकल मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीची महत्वपूर्ण बैठक आज (५ ऑगस्ट, रविवार) पुण्यात होत आहे. राज्यभरातील समन्वय समितीचे सदस्य या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ९ ऑगस्टला आंदोलन पुकारण्यात आलं आहे. या आंदोलनासंदर्भात महत्वाचे निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे.
एका बाजूला मराठा समाज आपली मागणी लावून धरत असतानाच दुसऱ्या बाजूला धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झालाय.. त्यामुळं धनगर समाजानं या लढ्याला तीव्र स्वरूप द्यायला सुरुवात केलीय.. या पार्श्वभूमीवर बारामतीसह परिसरातील धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं एकत्र येत भटक्या विमुक्त जातीच्या सवलती नाकारत आपले दाखले महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना परत केले.
दरम्यान, समजाला आरक्षण दिलं तर, नोकऱ्या आहे कुठं?, असा सवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थित केला. शिक्षणात आरक्षणाचा फायदा आहे मात्र नोकरीत मिळणं कठीण आहे असंही गडकरींनी म्हटलं आहे.